ऑनलाइन स्कूल फीडबॅक
नमस्कार
आम्ही आराध्य चे आई-वडील मी जयंत आणि मनोरमा.
Sun shine स्कूल मध्ये आराध्य चे ऍडमिशन ऑक्टोबर 2019 मध्ये घेतले आहे. 6 महिने स्कूल मध्ये जाऊन आराध्य मध्ये चांगली प्रोग्रेस होत होती.
जून 2020 पासून ऑनलाइन स्कूल चालू झाले तेव्हा मनात शंका होती की आराध्य मोबाइल वर लक्ष देऊन शाळा अटेंड करेल का? पण शाळा एवढा प्रयत्न करतेय तर आपण ही प्रयत्न करू.
सुरवातीला आराध्य ला मोबाईल समोर बसवने अवघड जात होते, पण प्राजक्ता टीचर poem बोलत असत तेव्हा तो लक्ष देऊ लागला. हळू हळू त्याला समजू लागले आणि तो सहकार्य करू लागला. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी, वॉर्म अप exersize, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करताना तो concentrate करू लागला. अगोदर हे खूप अवघड वाटत होते, आणि आम्ही गावी असल्यामुळे range चा प्रॉब्लेम येत होता, तरीही आराध्य ची आई ने गावच्या मंदिरात जिथे मोबाइला range येत असे अशी जागा शोधली. रोज 1 ते 2 आम्ही तिथे बसून आराध्य चे स्कूल चालू झाले. आराध्य ला ही हे routine पाठ झाले व त्याचे लक्ष लागू लागले,
व्हील्स on the बस, row row your बोट हे poem चे अकॅशन करायला शिकलाय. Scrubling, drawing मध्ये प्रोग्रेस झाली आहे. आम्हाला ही त्याचे ऍक्टिव्हिटी घेण्याची ट्रनिंग मिळू लागली. गावी पावसात मंदिरात जाणे येणे अवघड होते तरीही आराध्य ची शाळा घेण्यासाठी आम्ही तिथे जात असे.
सप्टेंबर पासून आम्ही मुंबईत आलो. मुंबईत शाळा घेणे सोपे जाऊ लागले. या लोकडोवन मध्ये मुले बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना फ्रेश ठेवायला आणि ऍक्टिव्हिटी साठी ऑनलाइन स्कूल चा खूप फायदा झाला.
प्राजक्ता टीचर ला आराध्य चांगला प्रतिसाद देतो. सुधीर सर पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी छान घेतात त्यातून मुले शिकत आहेत.
सर्व मुले एकत्र असल्यावर जी मुले शिकतील ते ऑनलाइन मध्ये मिस होतेय पण वेगवेगळ्या पद्धतीने ही मुले ही शिकू शकतात हे अनुभवून बरे वाटले.
नॉर्मल शाळा कधी चालू होते आणि आराध्य दुसऱ्या मुलांना आणि टीचर ना बघून कसा रेऍक्ट होतोय हे बघायची उत्सुकता आहे.
Thank you sunshine school team.
Comments
Post a Comment