*पेहराव*

                         *पेहराव*
गेले आठवड्यात कपडे कशी घातलेत यावरून एक विरोधी पक्ष नेत्याला काहींनी ट्रोल करायचा प्रयत्न केला. मी थोडासा तुटपुंजा प्रयत्न केला समजवायचा  की पेहराव म्हणजे ज्याचा प्रश्न असतो, त्यावरून चिडवणे योग्य नाही. पण तो असफल राहिला.
पण हा विषय काही डोक्यतून गेला नाही.
काही दिवसांपूर्वी एक आत्मकथन वाचले होते, *एक होता कार्व्हर* पेहराव वरून हसणारा मी पण एक होतो, पण हे पुस्तक वाचून माझ्या मनावरचा मळ धुतला गेला. पेहराव, रंग, वेशभूषा, खाणेपिणे सर्व दुय्यम असत, पाहिलं येत ते माणसाचे विचार, शिक्षण आणि सामाजसाठी काहीतरी करण्याची जिद्द.
आयुष्याचा कितीतरी काळ फक्त एक जोडी कपडे वापरून, वनस्पती शात्रात जगाला एका नव्या आयामावर घेऊन जाणारे कार्व्हर कुठे आणि फक्त नवीन आणि योग्य दिसणारे कपडे घालण्यात आयुष्य घालवणारे आपण कुठे.
खरंतर भारतात पण ज्यांना देशाचे पिता संबोधले जाते ते महात्मा गांधी आयुषभर अर्धे उघडे राहिले, पूर्ण भारत फिरले पण कधी अंगावर शर्ट की सदरा चढवला नाही, आशा महात्मा ला मानणारे आम्ही कापद्यवरून राजकारण करत असू तर ही आमची वैचारिक दिवाळखोरी आहे.
मी तर मानतो जो मला कपडे,पेहराव काय घातलाय या वरून ओळखतो तो मला अनोळखीच, जो मला माझे विचार-आचार, माझे ध्येय, उद्दिष्टे, सामाजसाठी काही करण्याची धडपड जाणतो तो मला ओळखतो आणि मी त्याला ओळखतो.
जर आजही फक्त पेहराव ही फक्त आपल्यासाठी निकष असतील तर आपण अजूनही खूप मागे आहोत.
जय हिंद, जय महाराष्ट्र.
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)