*कॅमेरात कैद झालेला देवदूत*

             *कॅमेरात कैद झालेला देवदूत - मयूर शेळके*

मयूर शेळके, मित्रा, भावा, साहेब, तारणहार, काय म्हणू तुम्हला?  देवदूत म्हणतो, हेच योग्य वाटतय आता मला. 
जे अशक्य काम करून धकावलात तुम्ही ते फक्त एक देवदूत करू शकतो. 
ताशी 100 किमी वेगाने येणारी रेल्वे, म्हणजे साक्षात मृत्यूच होता तो. एक अंध आई आपल्या 6-7 वर्षाच्या मुलाचा हात पकडून वांगणी (महाराष्ट्र) स्टेशन च्या प्लॅटफॉर्म वरून चालली आहे, प्लॅटफॉर्म जवळ जवळ मोकळा असतो, थोडे अंतर चालून झाले की चुकून त्या मुलाचा पाय घसरतो आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रॅक च्या मध्ये पडतो, आईचा हात सुटलेला असतो, तिला दिसत नसल्यामुळे ती हाताने चपापाते, पण हाताला मुलगा लागत नाही, मुलगा उभा राहून वर यायचा प्रयत्न करत असतो, इतक्यात समोरून भरदाव वेगात येणारी ट्रेन दिसते, ट्रेन उच्च वेगात असते, त्यामुळे ती थांबण्याचा प्रयत्न ही करू शकत नाही, आता सर्व संपले असे वाटत होते इतक्यात, ट्रेन ज्या दिशेनं येत आहे त्या विरुद्ध दिशेने एक तरुण ट्रॅक वरून पळत येतो, अगदी 3 ते 4 क्षणाचा वेळ, बघताना असे  वाटले ह तरुण तर मृत्यूकडे धावतोय, आता काय होणार? त्याने क्षणात त्या मुलाला प्लॅटफॉर्म वर ढकलले, तो पर्यंत ट्रेन अगदी 10 मीटर वर आली होती, तो स्वतः अजून ट्रॅक वर होता, काय होणार काय होणार असे आम्ही विचार करत होतो इतक्यात तो प्लॅटफॉर्म वर चढला आणि ट्रेन पास झाली. हे कमरेत कैद नसते झाले आणि कोणी तोंडी सांगितले असते, तर सांगणारा अतिशयोक्ती करत आहे असे सर्वाना वाटले असते, पण हे करणारे देवदूत *मयूर शेळके* हे खरे शूरवीर आहेत. 
तुम्ही फक्त मुलगा नाही वाचवला, एक आईच काळीज वाचवलत, एक वडिलांचं कर्तृत्व वाचवलत, माणुसकी वाचवलीत, भारतीय रेल्वेची शान वाढवलीत. 
तुमच्या बद्दल लिहू तेवढे कमी आहे. 

सरकारने तुम्हला शौर्य पुरस्कार द्यावा हीच विनंती करतो. 
https://youtu.be/ZodDkxtv0DI या विडिओ ची you tube लिंक जोडत आहे. 
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)