world autism awareness day
World autism awareness day
1. Autism is not a disability. it's a different ability.
2. Seeing the world from a different Angle.
3. Just Different not less..
4. It's ok to be Different.
ऑटिझम म्हणजे स्वमग्न, सोप्या भाषेत सांगायचे तर स्वतःच्या विश्वात रमणे, एक वेगळ्या नजरेने गोष्टी बघणे, जे सामान्य व्यक्ती किंवा मुले अनुभव किंवा जाणीव करू शकत नाहीत ते ही मुले अनुभवतात. प्रत्येक स्वमग्न मुलगा वेगळा असतो, काही बोलू शकत नाहीत, काही बोलतात पण नजरेला नजरबडेत नाहीत, काही मध्ये खूप एनर्जी असते, ती खूप पळतात किंवा उड्या मारतात, गर्दी आवडत नाही, समजते सर्व पण व्यक्त करता येत नाही म्हणून चिडचिड होते त्यांची. म्हणून चिडून कधी कधी स्वतःचे डोके भिंती वर अपटतात, रडतात, गोष्टी अपटतात, पण त्यांना त्यांची चूक ही लगेच समजते.
त्यांना गरज असते समजून घेणारया पालकांची, भाऊ बहिणीची, नातेवाईकांची, आणि सर्वात महत्वाचे समाजाची.
जगात 67 मुलांपैकी 1 असा हा आजार होत आहे. या आजाराचे खर कारण अजून मिळालं नाही, पण बदलली जीवनशैली याचे मुख्य कारण असू शकते असे तज्ञ मानतात.
यावर मात करता येते पण त्यासाठी खूप वेळ जातो, ओकपेशनल, स्पीच, स्वभाव थेरेपी, स्पोर्ट्स थेरेपी असे अनेक थेरेपी आणि औषधे देऊन याना एका वेगळ्या अद्भुत जगातून सामान्य जगात आणावे लागते.
जगातील काही महान व्यक्ती जसे आइन्स्टिन, नेपोलियन बोनपार्ट, असे अनेक व्यक्ती या आजारातून बाहेर आले आणि अजरामर झाले आहेत.
आजही बहुसंख्य समाजाला हा आजार म्हणजे नक्की काय हे माहीत नाही, जर तुम्हाला कधी, जास्त हालचाल करणारा, तोतर बोलणारा, नजर चोरणारा, काहीही न बोलता, फक्त ऐकणारा, एकांतात नजर लावून बसलेला, उगाचच चिडचिड करणारा मुलगा/मुलगी दिसली, जर तो एकटा असेल तर त्याला आधाराची गरज आहे हे समजून जा.
We can feel the sense, we can sense the feeling.
Comments
Post a Comment