*एक गोष्ट मातृत्वाची* मनोरमा
*एक गोष्ट मातृत्वाची*
काही गोष्टी करत असताना त्या किती अवघड आहेत हे कधी कधी जाणवत नाही. त्या करून झाल्यावर नंतर जेव्हा आपण त्या आठवतो तेव्हा आपल्याला कळते किती अवघड काम आपण केलेलं असते, हे काम कसे काय पूर्ण करू शकलो म्हणून नंतर आपण आश्चर्याने तोंडात बोट घालतो. आज या मतृदिनी मागे वळून बघताना मला आठवले ते मानिषाने केलेले अथक प्रयत्न 2017 -2018 वर्षात. आराध्य ला घेऊन अक्षरक्ष उचलून घ्यावे लागायचे करण तो जास्त अंतर चालायचा नाही. 3 वर्षाचा पोरगा उचलून, त्याची बॅग पाठीवर घेऊन, घरातून चालत चालत कोपरखैरणे स्टेशन ला जायचे. त्याला उचलून तसेच त्या गर्दीत चढायचे, कधी सानपाडा तर कधी जुई नगर ला उतरायचे, प्लॅटफॉर्म बदलायला ते स्टेशन चे उंच जिने चढायचे आणि उतरायचे आणि कुर्ल्याला जाणारी ट्रेन पकडायची. टिळकनगर ला उतरून परत चालत चालत स्टेशन बाहेर येऊन रिक्षा शोधायची, त्यात आराध्य कधी खांदयवर झोपायचा, तर कधी मस्ती करत असायचा, त्याला गाड्यांची भीती वाटायची नाही त्यामुळे तो धावणाऱ्या गाडी कडे पाळायचा. त्यामुळे सतत त्याचा हात पकडून राहायचे आणि रिक्षा ची वाट बघायची. कधी कधी रिक्षा लगेच भेटत नसत मग ते 1 किलोमीटर अंतर चालत जायचे आणि थेरेपी सेन्टर वर पोहचायचे. त्या 45 मिनिट सेशन साठी दीड तास जायचे आणि दीड तास यायचे, असा प्रवास ती करत होती. परत येताना थकलेला अन8 चिडलेला आराध्य, त्याला भूक लागलेली असायची, परत 1 किलोमीटर चालत टिळक नगर स्टेशन घाटायचे, आराध्य ला उचलून प्लॅटफॉर्म बदलायचे, गर्दीत ट्रेन पकडायची, मग वाशी ला पोहचायचे, ठाणे ट्रेन उशिरा असायची, मग तिची वाट बघत बघत आराध्य ला जेवण भरावयाचे, कधी कधीं तो झोपलेला असायचा. आठवड्यातील 3 दिवस कुर्ला सेशन आणि 2 दिवस स्पीच सेशन असे अथक परिश्रम चालले होते. असे 1 वर्ष तिने अथक परिश्रम घेतले ते ही न थकता.
घरातून सकाळी 11 ला निघायचे ते संधकाली 4 ला घरी पोहचायचे. कधी कधी तिचे जेवण वाशी स्टेशन वर जेवायचे, किंवा घरी आल्यावर 5 वाजता जेवायची.
एकदा आराध्य ने ट्रेन मध्ये एका बाईचा चष्मा ओढला होता आणि त्याची एक काच तुटली होती. मनीषा आणि आराध्य ला तिने वाशी स्टेशन वर थांबवुंन ठेवले होते. नेमकं त्या दिवशी मी site वरून घरी आलो होतो, मानिषाने मला फोन केला आणि वाशी स्टेशन वर बोलावले. मी लगेच पोहचलो ती बाई पूर्ण चष्म्याचा खर्च मागत होती. मनीषा तिला एक काचेचा खर्च देत होती पण ती तयार होत नव्हती, मग मी जाऊन तिला म्हटले आम्ही तुमचा चष्मा नीट करून देतो. तिचा चष्मा घेऊन नीट करून 2 दिवसानी खांडेश्वर जाऊन देऊन आलो. असे आराध्य चे मस्ती चे किस्से आम्हाला पचवावे लागायचे.
आज मागे वळून बघताना तिच्यातील ते मातृत्व ची शक्ती दिसत आहे. आजही तिचे परिश्रम चालू आहेत, आणि ती यश ही मिळवत आहे. तिच्या पाठीशी तुम्ही सर्व जण उभे राहिलात म्हणून तिला हे शक्य झाले असे मला वाटते. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.( धन्यवाद नाही, कारण तसे बोलून मी परक होईन)
आजचा हा मातृदिन तिला आणि अशा सर्व माता ना आनंदाचा जावो ह्या लाख लाख शुभेच्छा. 💐💐💐💐
Comments
Post a Comment