आराध्य जगताप पालकत्व

----------आराध्य बद्दल माहिती-----
आई -बापू आणि मम्मी-पप्पा यानंतर,  ताई, विजय, पद्माकर आणि अमित तुम्ही चौघे सर्वात पहिले ब्लड रेलशन आहेत. आणि पाचवी सुप्रिया जि आराध्य ला पूर्ण पणे समजते आणि आराध्य तिच्यासोबत आनंदी राहतो. 
एक सदृढ मूल कोणीही सांभाळू शकते. कारण ते त्याच्या गरजा स्वता सांगू शकतो, बोलू शकतो, भूक, तहान, काही दुखले, शी-सु आली तर सांगू शकतो किंवा स्वतः सर्व घेऊ शकतो किंवा मागू शकतो. आराध्य ला आपण सर्व खूप जीव लावता आणि प्रेम करता. त्याचा life इन्शुरन्स म्हणजे आपण सर्व आहात. हो महत्वाचे म्हणजे जबाबदारी घेण्याची जबरदस्ती नाही आहे. 
ही माहिती लिहण्याचा उद्देश हा आहे की, जर भविष्यात आराध्य ची जबाबदारी तुमच्या वर आली तर तुम्हाला व आराध्य ला सोपे जावे. 
     आपल्या सर्वाना माहीतच आहे की आराध्य ला आखडी आल्यामुळे त्याची बौद्धिक वाढ हळू हळू होत आहे.
तो बोलायला शिकत आहे. त्याची ओकपेशनल आणि स्पीच थेरोपी चालू आहे. Sunshine मध्ये त्याची शाळा चालू आहे. ETC वाशी मध्ये ओकपेशनल, स्पीच आणि सायकॉलॉजी थेरोपी चालू आहे. सोनाली गडकरी कडे ऐरोलीत आणखी एक स्पीच थेरोपी चालू आहे. कोपरखैरणे मध्ये सेक्टर 1 मध्ये संयोगनी सेंटर आहे, तिथे ओकपेशनल थेरपी चालू आहे. मध्ये सर्व डोकमेन्ट, सर्टिफिकट काढून ठेवले आहेत. मेडिकल ची त्याची 2 file आहेत. नॉर्मल आजाराचे पेपर नी आखडी संदर्भात पेपर ची 1 file आहे. 
आखडी येऊ नये म्हणून त्याला valprin 500mg  हे औषध रोज 2 वेळा 5ml व lavera 100mg हे औषध रोज 2 वेळ 1.5 ml असे चालू आहे. सोबत होमियो पॅथी च्या 2 गोळ्या रोज 2 वेळा देत आहोत. डॉक्टर शेखर पाटील यांच्याकडे 6 महिन्यांनी चेक अप करायचा असतो. दरवर्षी एकदा ब्रेन चा EEG करून ब्रेन चे function कसे चालू आहे ते चेक करायचे असते. Dr. अमित वटकर मो. 8767844488 यांच्याकडे EEG होते. त्याची प्रत्येक 1 वर्षाने डोक्याची EEG करावी लागते आणि त्यानुसार त्याचे औषध किती द्यायचे ते ठरते. 
त्याची कधी कधी खूप चिडचिड होते. बोलता येत नाही पण बऱयापैकी सर्व समजते. तो आता लहान नाही ये. प्रेम, राग, त्याला लावलेला लळा त्याला समजतो. त्याच्यावर सतत ओरडायचे नाही, त्यामुळे तो चिडचिडा होईल. त्याला attention हवे असते. 1 व्यक्ती त्या सोबत असेल तर तो सुरक्षित राहतो. त्याला मैदानी खेळ खेळवून थकवावे लागते. 
त्याला गाड्यांची आणि प्राण्यांची अजून जास्त भीती नाहीये. त्यामुळे रस्त्यावर त्याचा हात पकडणे योग्य आहे. 
नारळाचे झाडाचे पान त्याला हलवायला आवडते, रस्त्याने जाताना त्याचे लक्ष त्या झाडाकडे असते. 
आराध्य बोलू शकत नाही, पण काही गोष्टी तो हाताने धाकवतो. 
आराध्य ला खायला मेथी, मसालेभात, भेंडी,  पावभाजी, कांदा भजी आवडतात. रोजच्या जेवणात त्याला पहिला घास जबरदस्ती भरववा लागतो. मग तो स्वतःहून खातो. 
 भूक लागली की पीपस म्हणजे चिप्स म्हणतो, पाण्यासाठी पा म्हणतो. सु आली की सु च्या जागेला हात लावतो. सु चू जागा स्किन मागे करून दर 2 दिवसांनी धुवावी लागते, तिथे त्याला इन्फेकॅशन होण्याची शक्यता असते. अजयन्स हॉस्पिटल मध्ये त्याला नेऊ शकता. अजून ही खूप गोष्टी आहेत ज्या हळू हळू तुम्ही माहिती करून घ्या. 
वरील माहीती प्रॅक्टिकल होऊन वाचा आणि लक्षात ठेवा, इमोशनल होऊ नका. प्रॅक्टिकल पालक म्हूणून आराध्य बद्दल जेवढ आपल्या सर्वांना माहीत असेल तेवढा त्याला समजून घेणं सोपं जाईल म्हूनून हे लिहून share करत आहे. 😊😊.

इन्शुरन्स पेपर ची 1 file आहे. 
माझा hdfc life मध्ये टर्म इन्शुरन्स आहे 50लाख चा. बाकी कंपनी covergae आहे. मनीषा चे LIC चे 2 इन्शुरन्स आहेत. 
Comapny मध्ये मुख्य संपर्क आहे शिरीष मालवतकर मो 9970097325.

वरील माहीती फक्त आराध्य च जीवन व्यवस्थित राहावे यासाठी आपल्यासोबत share करत आहे. 



25 ऑगस्ट 2021
आज मनीषाला खूप चांगली कल्पना सुचली, आराध्य 21 वर्षेचा झाला की त्याचे स्पेर्म काढून सर्गोसी mother तर्फ त्याचा मुलगा किंवा मुलगी जन्म घेऊ शकते. 

8 जून 2022.
कोरोना मुळे आमची जी हानी झाली ती म्हणजे, आरु ची शाळा आणि थेरेपी सुरळीत चालू होती ती बंद झाली. 
त्यामुळे 2 वर्ष थांबावे लागले. 
मार्च 2022 पासून परत एकदा शाळा आणि थेरपी पुन्हा एकदा सुरळीत चालू झाल आहे. 



Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)