पुन्हा सुरवात
*पुन्हा नवीन सुरवात*
31 मार्चला कोची वरून मुंबईत आलो आणि महाराष्ट्रात दुसरे lockdown चालू होणार याची चर्चा सुरू झाली होती. दुसरी लाट हा हा म्हणता राज्यच्या उंबरठयवर पोहचली होती. पहिली लाट अचानक आली होती आणि लोकडोवन देखील अचानक केले गेले होते, तशी ती गरजच होती. यावेळी मात्र अजून नीट नियोजन करून लोकडोवन ची गरज होती आणि नियोजन ही तसेच चालू होते. सर्विस इंजिनियर म्हणून जुलै 2009 पासून ते 2020 पर्यंत गेल्या 12 वर्षात मी सतत फिरत होतो. जास्तीत जास्त 1 महिना मी घरी थांबलो आहे अन्यथा 10-12 दिवस साईट मग 8-10 दिवस घरी, असे गोल चक्र चालू होते. गेल्यावर्षी संचारबंदी लागू झाली आणि लगेच गावी गेलो होतो. गावचे वेगळेच जीवन अनुभवायला भेटले होते.(त्यावर मागे लिहले आहे).
या वर्षी गावाकडे ही दुसरी लाट पसरत होती त्यामुळे मुंबई सोडून बाहेर गावी जाणे योग्य नाही हे ओळखुन मुंबईत राहायचे ठरवले. तरीही सुरवातीला मनाची चलबिचल होत होती. गाव की मुंबई असा शिवशीविचा खेळ मनात चालू होता. जसे एखाद्या बंद खोलीत मांजर अडकल्यावर सुरवातीला दारावर जोरदार धडका मारते, मग हळूहळू थकले की शांत बसून दरवाजा उघडण्याची वाट बघत बसते, तसे मनाचे झाले होते. 1 आठवडा सर्व धडका मारून झाल्यानंतर आता शांत पणे या संचारबंदी संपण्याची वाट बघायची हे ठरले. जरी साईट वर जाणे बंद होते तरी काम बंद नव्हते. ऑनलाइन सपोर्ट देऊन मशीनचे इंस्टॉलशन, commissioning, करून घेणे, कॅलिब्रेशन करून घेणे, *पॉवर, स्टील, सिमेंट industries चालू होत्या त्यामुळे त्याना सर्वोतोपरी सहकार्य करून त्यांचे प्लांट व्यवस्थित चालू ठेवणे हे आमचे मुख्य कार्य असते.* मेन्टेनान्स करणे, concall घेऊन मीटिंग करणे, कस्टमर touch सुटू नये म्हणून सर्वाना कॉल करून त्यांची चौकशी करणे, यासोबत इंटर्नल कॉल, सेल्फ devlopment कोर्सेस, सेफटी मीटिंगस, कोविड चे अपडेट्स घेणे, नवीन प्रोटोकाल समजून घेणे, बिजनेस ची फाइल update करणे, जुने PO execution चे time line ठरवणे, त्यांची शिपिंग date मागे पुढे करणे, सहकार्यबरोबर चर्चा करणे असे अनेक प्रकारे ऑफिस वर्क चालू होते.
सोबत आराध्य(माझा 6 वर्षाचा मुलगा) जो autism ग्रस्त आहे. त्याची विशेष (special) शाळा ऑनलाइन चालू होती, त्याची आई त्याची शाळा घायची. शाळा झाली की त्याला खेळवणे माझी जबाबदरी होती आणि आहे. आराध्य ला शारिरिक खेळवले नाही तर तो चिडचिड करतो, गार्डन बंद होते, चाळीत खेळू शकत नव्हतो, मग आम्ही घरातच त्याला विविध प्रकारे शारीरिक खेळ खेळवायला सुरवात केली. (यावर खूप आहे लिहायला, परत कधी तरी लिहीन).
आराध्यची आई आमच खाणे पिणे, जेवण, नाश्ता, फळे, भाज्या, रोजचे घरात लागणारे सर्व साहित्य याचे नियोजन करून आठवड्यातून एकदा बाहेर जाऊन घेऊन यायची. तिने इतके छान नियोजन आखले होते की, आराध्य आणि मी खाण्यापिण्यात कधी कंटाळलो नाही, विविध भाज्या, विविध व्यंजने, नवीन पदार्थ ती बनवत होती, त्यामुळे जेवन ला कधी कंटाळलो नाही. विविध फळे आणि हापूस ची तिने इतकी छान व्यवस्था केली की आंबे खाण्याचा आता कंटाळा आला. सोबत तिची केक बनवण्याची आवड आणि छंद तिने इतका जोपासला की आता ती एक उभरती प्रसिद्ध केक मेकर म्हणून नावारूपास येत आहे.
असे करत करत 1 एप्रिल ते 9 जून 2021असे 70 दिवस आम्ही मुंबईत घरी राहून लोकडोवन यशस्वी करण्यात सहकार्य केले.
आता पुन्हा एकदा नवीन सुरवात होत आहे, सोबतीला पाऊस आहे. आज 10 जुनला 70 दिवसानंतर परत मी साईट वर निघालो आहे. मुंबई एअरपोर्ट वर पोहचलो आहे. इंटरनॅशनल उड्डाणे बंद आहेत त्यामुळे खूप कमी माणसे आहेत. सर्व काळजी घेऊन परत एकदा नवीन सुरवात करायची आहे.
सर्वांनी काळजी घ्या.
धन्यवाद
जयंत जगताप
मुंबई ते हैद्राबाद
10.6.2021 5:30am.
Comments
Post a Comment