धंदा व नोकरी

धंदा व नोकरी 
काही छोटे व्यावसायिक, धंदेवाले, आपला व्यवसाय सुरू केला की नोकरी म्हणजे गुलामी असे बोलत असतात आणि ते म्हणजे स्वतंत्र राजे अशा थाटात समाजात बोलत असतात. धंदा नक्की करा, तुमच त्यासाठी अभिनंदन केलंच पाहिजे. परंतु नोकरी वाले गुलाम नसतात, त्यासाठी ते वेतन घेतात, ते पण आपले कला गुण, स्किल्स, knowldge विकत असतात. 
 गुलाम म्हणजे, मना विरुद्ध कोणतेही वेतन न देता करून घेतलेलं कष्ट असत. त्यात त्यांना काहीही अधिकार नसत. फक्त रोजच जेवण ते पण मालक देईल ते असायचं. 
आज जगातील 40% जनता काम करते जे धंदे चालू आहेत तिथे काम करून वेतन मिळवने आणि तो धंदा मोठा करणे याला नोकरी म्हणतात.
काही धंदेवाले याला गुलामी म्हणत असतात. स्वतःचा व्यवसाय नक्की करा पण नोकरी करून देश सुरक्षित ठेवतो तो जवान, शेतात बिगारी करून बागायतदारची बाग फुलवतो तो बिगारी पण नोकरी करतो. सर्व मोठे धंदे या नोकरदारमुळे चालू असतात. कोणताच धंदेवाले ह्या हुशार,  skilled नोकरदारशिवाय व्यवसाय मोठा करू शकत नाहीत.
धंदा करायला लागणारे समान आणि तयार होणारे प्रॉडक्ट विकायला मार्केटिंग, सेल्समन, सर्विस, सप्लाय चैन यात सर्व नोकरी करतात, म्हणून धंदा चालतो.
नोकरीत बंधन असतात पण त्यापेक्षा जास्त धंद्यात असतात. त्यामुळे धंदा आणि नोकरी हे  हवा पाण्यासारखे आहेत. दोघे आवश्यक आहेत. चाकरमान्यांना हिणावू नका रे...

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)