*B4U*

  ---------------------*B4U*----------------------

दूरदर्शन कडून हळू हळू केबल च्या जगात tv चा प्रवेश होत होता. त्याआधी, रविवारी 12 वाजता लागणारे छायागीत हेच दृश्य गाण्याचा स्रोत होता. केबल च्या जगात झूम, mtv, शेमारो, V tv, 9xm असे अनेक गाण्यांचे चॅनेल आले. त्यात जुन्या गाण्यांचं, कमी ऍड असलेलं आणि मुख्य म्हणजे सतत फक्त गाणी चालू असलेलं चॅनेल म्हणजे B4U. कधी काही काम करत करत मध्ये गाणी बघायची असतील तर, मूड रिलॅक्स करायला हे हमखास आवडीचे चॅनेल. 
आज हे आठवायचं कारण म्हणजे परवा abp माझा च्या कट्यावर सध्या महाराष्ट्रभर गाजलेलं व्यक्तिमत्व शहाजी बापू पाटील आले होते. गुहावटीला असताना त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन केला आणि विचारले "कुठे हाय नेते".
बापू सांगलीच रांगड आणि बिनधास्त आमदार. आपल्या शैलीत बोलून गेलं गुहावटीला आहे, काय डोंगार..काय झाडी..काय हाटेल.. ओक्के हाय समद. बापूंचा तो कॉल viral झाला आणि मीडिया मध्ये सगळी कडे फिरू लागली. 
बाप्पूना ते दुसऱ्यादिवशी समजले. न्युज फक्त तेच चालू होतं. माझा कट्टयावर हे सांगताना बाप बोलले मी हे बातम्या वर बघून बघून दमलो बातम्या बंद करून, रूम मध्ये बसून फक्त B4U लावून गाणी ऐकायचो. 
आता इंटरनेट जगात, youtube, इंस्टा च्या जगात हे चॅनेल कुठे तरी हरवले अस वाटत असताना बापू नी ते नाव ऐकवलं आणि B4U वर एक लेख बनतोच हे मनाशी ठरवून हा प्रपंच केला.😊
जाता जाता B4U चा मी लावलेला अर्थ Best 4 You (B4) आपलाच जयंत जगताप (B4U)
तुमच्या आवडीचे music चॅनेल सांगा☺️

Writing Place
Inside Bhubaneswar to Mumbai flight. time 4:57PM

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)