भुरळ घालणारा सोलापूर

        भुरळ घालणारा जिल्हा सोलापूर
    लहानपणी शाळेत असताना सगळ्यात पाहिले कोणत्या देवीचे नाव वाचनात आले असेल तर ते म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी देवी.. स्वराजाच प्रवेशद्वार आणि त्यावर अफजल खानने केलला पहिला आघात. पण जागृत देवस्थान अशी मिटत नसतात ती धगधगत्या ताऱ्याप्रमाणे अजून जास्त तेजस्वी होत जातात. असच महत्व आहे आई तुळजा भवानीच.. 
तिच्या बाजूलाच धाराशिव मध्ये आहे येढाई देवी. छोट्याशा पठारावर वसलेली पण मोठं महात्म्य असलेली येढाई देवी मंत्रमुग्ध करते. तिच्या पठाराला वेढा मारताना मन एक वेगळ्याच विश्वात जाते. परत  सोलापुरात आलं की स्वामींच दर्शन घेतल्या शिवाय पाय निघत नाही. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". या एका वाक्यता अफाट अशी मानसिक शक्ती आहे. स्वामींचा आशीर्वाद घेऊन मुंबई कडे पाय वळले की आपोआप आपण खेचले जातो ते पांडुरंगाच्या भक्तीत.
निष्पाप, साधीभोळी, सर्वांना समावणारी अशी पांडुरंगाची भक्ती आणि वारकऱ्यांचा प्रेम बघायचं असेल तर पंढरपूर शिवाय पर्याय नाही. देवाची पंढरी म्हणतात ते उगाच नाही याचा प्रत्यय आला. 5 किलोमीटर कधी चाललो कळले नाही, भूक विसरलो, कडक उन्हात चालत होतो पण थकत नव्हतो, शेवटी दर्शन घेऊन बाहेर आलो तरी निघायची इच्छा नव्हती. सर्विकडे भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, माऊली, रामकृष्ण हरी चा गजर, टाळ आणि मृदंग चा कानात हवाहवासा वाटणारा आवाज, कीर्तनाचे आवज आणि शांत वाहणारी चंद्रभागा.. 
अशी  भाविक भक्तांना समृद्ध करणारी देवस्थान असणारा सोलापूर जिल्ह्या, सुंदर रस्ते, पुण्याकडून जाताना  रस्त्याच्या कडेला लागणारे उजनी चे पात्र आणि बॅक वॉटर, वाटेत पेरू आणि उसाची रसची दुकान.. घरगुती जेवण.. सपाट प्रदेश, रांगट पण प्रेमळ माणसं आणि सोलापुरी चादर आणि रुमाल देणारा सोलापूर जिल्ह्या मनाला भुरळ घालून गेला.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)