हे विसरू नका
*हे विसरू नका*
नेहमीच सुखाच्या शोधत धाऊ नका. रस्ता चांगलाच असला पाहिजे हा अट्टाहास धरू नका.. हिरवेगार रस्ते, सावली देणारी झाडे,
यात जमेल इतकं नक्कीच चाला पण,
तोच रस्ता आयुष्यभर असेल असं गृहीत धरू नका.
चढ-उतार, खळगे, अवघड वळणे आणि घाट,
यात ही स्वतःला सिद्ध करा...
कधी कधी रस्ता संपला अस वाटेल तेव्हा,
नवीन वाट तयार करण्याची संधी चुकवू नका..
आपला वेग इतका ही वाढवू नका की,
U turn ची गरज पडली तर घेता येणार नाही..
रुक्ष, परिस्थितीने तापलेले रस्ते ओलांडत,
जेव्हा सुखाची विहीर सापडते तेव्हा,
ते आनंदाचे पाणी सर्वात जास्त गोड लागते,
हे विसरू नका..
आणि हो सोबत अनुभवाचे गाठोडे असलेले,
आपले जुने जाणते आपले सोबत आहेत
तो पर्यंत कोणतही संकट आपल्याला तोडू शकत नाही
हे विसरू नका..
कवी जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment