दिंडी जागर
*दिंडी*
थंडीचा काळ चालू झाला की मार्गशिष महिन्यात,सातारा जिल्ह्यात ग्रामदैवत यात्रा चालू होतात. आमचे गाव महू. दत्त जयंतीला गावचा सप्ताह म्हणजेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होतो. त्या अगोदर गावकीचे साफसफाई काम करून संपूर्ण गाव, सर्व मंदिरे, पाण्याची टाकी, रस्ते, बनतील मंदिर स्वछ साफ आणि सुंदर केली जातात. दत्त जयंती पासून 7 दिवस, सकाळी काकड आरती, दिवसभर पारायण, मग संध्याकाळी प्रवरचन, हरिपाठ रात्री 3 तास कीर्तन आणि मग जागर.. असा 24तास देवाची भक्ती आणि भक्तिमय वातावरण. शेवटचे पाच दिवस पाच भावकयतर्फे गाव जेवण आणि शेवटी दिंडी दिवशी भव्य पालखी मिरवणूक, भजन आणि काल्याचे कीर्तन आणि काल्याचे प्रसादाचे जेवण.
चांगभलं बोला......आ...चांगभलं.....
Comments
Post a Comment