उत्तम
*उत्तम*
उत्तम म्हणजे चांगले, उत्कृष्ट. एखादे काम मनासारखं झाले की आपण म्हणतो उत्तम झालं. हा झाला शब्दाचा अर्थ.
असेच उत्तम नावाचे अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. काही कामात ही उत्तम असतात. असाच मला आठवणारा उत्तम म्हणजे उत्तम खुडे.
आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की ज्या कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहिलेल्या असतात. त्यांचा आणि आपला डायरेक्ट काही संपर्क नसतो, संबध नसतो पण ते आपल्या जडणघडणीत एक भाग झालेले असतात. गावची जडणघडण होते ती अनेक विविध प्रकारच्या लोकांच्या सामूहिक कार्यातून, आपापल्या कलेतून आणि गावच्या जपल्या जाणाऱ्या परंपरेतून.
गावचे मुख्य 2 सण म्हणजे दसरा आणि ग्रामदैवत काळभैरवाची यात्रा. या 2 सणात गावची पालखी निघते ती बिरमाणेवाडीला तामजाय देवीला कौल लावते आणि परत गावच्या शिवेवरून फिरत फिरत नदीवर येते, तिथून बनातील मंदिरात विश्रांती घेऊन मग तिथून देव अंगात येतात आणि त्यांना घेऊन पालखी सोबत गावात येते. देव नाचवणे, त्यांना योग्य पारंपरिक संगीत वाजवून पुढे पुढे घेऊन जाणे हे कार्य करतात ते गावातील मांगवाड्यातील पारंपरिक बँड वाले. देव नाचवायचे हे मानाचे पारंपरिक काम अतिशय उत्साहात करणारे हे खुडे कुटुंब. शामराव, नंदू, उत्तम, विलास खुडे यांनी हे कार्य पिढ्यानपिढ्या अविरत अतिशय उत्तमरित्या पार पाडले आहे.
सर्वांचे काम छानच आहे पण उत्तम लहानपणापासून आठवणीत राहिला आहे तो त्याच्या वेगळ्यापणामुळे. उत्तम डफ वाजवतो, तो लेफ्टी आहे, एका डोळ्याने थोडासा काना बघतो त्यामुळे तो मान थोडीशी वाकडी करून उजव्या हाताने डफावर थाप मारून डाव्याहाताने, काठीवर डांबराचा गोळा लावून तयार केलेल्या छडीने रोमांचित करणारा आवाज काढतो. त्यासोबत देव एका तालात नाचतात आणि एक मंतरलेले वातावरण तयार होते. उत्तम चे वाजवणे सर्वोत्तम आहेच पण स्वभाव अतिशय नम्र आहे. एक दोन वेळा बोलणं झालं त्यात त्यांचा नम्रपणा ओसंडून वाहत होता. कोठेही कधीही बँड बघितले की पहिली आठवण येते ती उत्तमची. लहानपणापासून आमच्या अनेक पिढ्या या उत्तम च्या उत्तम वाजाच्या आणि वेगळ्या शैलीच्या प्रेमात आहेत यात शंका नाही. लग्न मिरवणुकीत घोड्याच्या तोंडासमोर जाऊन घोडयला उत्तेजित करण्यात उत्तम चा हात कोणी धरू शकत नाही.
उत्तमला साथ देनारे विलास, नंदू , शामराव हे त्याचे भाऊ. कोरोना काळात शामराव हे देवाघरी गेले आता विलासचा मुलगा किरण ताशा, नंदूदादा पिपानी, नवीन सहकारी भिसे हे ट्रॅपेट आणि एक काका खुळखुळा वाजवून उत्तमला जबरदस्त साथ देत आहेत.
अजून येणारी किती वर्ष हे बँड चालेल माहीत नाही पण ज्या आठवणी उत्तम तयार केल्या आहेत त्या चिरकाल राहतील यात दुमत नाही.
या यात्रेनिमित्त उत्तम आणि बँड पथकाला मानाचा मुजरा. 👌👌👌.
धन्यवाद
लेखक जयंत जगताप

Comments
Post a Comment