टाटा

   *टाटा - values are stronger then steel*
लहान मुलांना विशेषतः मराठी कुटुंबातील मुलांना, अगदी लहानपणापासून माहीत असलेला शब्द म्हणजे टाटा. कोणी पाहुणे निघाले की, त्यांना टाटा करने आणि बोलने सर्वात पहिले शिकवले जायचे. आता इंग्लिश बाय, आणि फ्लाय किस आले. असो.. 
तेव्हा पासून माहीत की टाटा म्हणजे हात वर करून पंजा हलवणे. नंतर हळू हळू मोठं होताना टाटा ची सुमो मधून प्रवास होऊ लागला. आपण जाताना टाटा करतो आणि ती माणसे त्या गाडीने जातात म्हणून। तिच नाव टाटा ठेवलय असा माझा लहानपणीचा समज होता. मग हळू हळू मोठं होत असताना सगळीकडे टाटा दिसू लागलं. स्टील टाटा, मीठ टाटा, गाड्या टाटा, हॉटेल टाटा, विमान टाटा, चहा टाटा, इलेक्ट्रॉनिक्स टाटा, सॉफ्टवेअर टाटा, फोन टाटा, घर टाटा, सरकारी प्रोजेक्ट टाटा, सर्वात महागडी कार पण टाटा आणि स्वस्त कार पण टाटा, अगदी झारखंड मधील मोठं शहर पण टाटा. भारतातील प्रत्येकाला टाटा नावाचा आदर वाटतो. 
फक्त उद्योगक्षेत्रात नाही तर नवीन भरारी कशी घ्यावी ती पण करारी याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे टाटा. 
जमशेदजी टाटा, दोराबाजी टाटा आणि रतन टाटा यांनी अजरामर केलेल नाव टाटा. आज रतन जी टाटा यांचा 85 वा वाढदिवस. नावाप्रमाणेच अनमोल रतन असलेले हे महान रतन टाटा आहेत. टाटा स्टील च ब्रीद वाक्य आहे, *"values are stronger then steel"* मराठीत म्हटलं तर, *भावना ह्या लोखंडा पेक्षा मजबूत असतात* अस values जपणार नाव म्हणजे टाटा. 
टाटा ना माझ्याकडून मानाचा मुजरा

जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)