बकासुरन..
*बकासुरन*
महाभारत मध्ये अनेक वाईट प्रवृत्ती चा वध भीमा च्या हस्ते झाला आहे. युद्धभूमीवर अर्जुनाला गीता ऐकवावी लागली तेव्हा त्याच मनावरचं ओझं दूर झालं आणि आप्तस्वकीयां विरुद्ध लढायला तयार झाला. त्यासाठी श्रीकृष्णाला विश्वरूप दाखवावे लागले. पण एक योद्धा असा होता जो गपगुमान जे श्रीकृष्ण सांगेल ते करून मोकळा होत असे. किंवा त्यावेळेस त्याला जे योग्य वाटत असे ते करत असे. तो म्हणजे महाशक्तीशाली भीम. पांडवांनी अंतिम युद्ध जिंकले असले तरी त्याचा पाया आणि शेवट भीमाने केला आहे. शरीराचे कितीही तुकडे झाले तरी ते तुकडे परत जोडून उभा राहणारा जरासंध. त्याचे तुकडे करून विरुद्ध दिशेला फेकणारा भीम. बाहुबलात दुर्योधन, कर्ण, भीम यांच्याइतकाच अफाट असणारा किचक. त्याला बाहुपाशात दाबून मारणारा भीम. शरीर पोलाद झालेल्या पण मांडी वर कमकुवत असलेल्या दुर्योधनाला मांडीवर प्रहार करून मारणारा भीम. हे त्याने केले श्रीकृष्णाने दिलेल्या युक्ती नुसार. पण जेव्हा पांडव चौदा वर्ष वनवासात होते तेव्हा फिरत फिरत त्यांचा मुक्काम अशा भागात गेला होता तिथे बकासुर नावाचा राक्षस राहत होता. त्याला इतके खायला लागायचे की गावेच्या गावे नष्ट झाली होती. तेव्हा सोबत श्रीकृष्ण नव्हता आणि बकासुर ला कसे मारायचे हे स्वतः भीमाला ठरवायचे होते. तिथे भीमाने स्वतःचे युक्ती ने बकासुरला ठार करून *बकासुरन* हे बिरुद मिळवलं.
आजच्या काळात लहान मुलांच्या बुद्धीला खाणारा बकासुर म्हणजे मोबाईल आहे. त्याला लहान वयात आपल्या मुलाकडे नका देऊ किंवा तुम्ही श्रीकृष्ण बनून त्यांना मार्गदर्शन करत राहा. किंवा त्यांना भिमासारखं बलाढ्य बनवा आणि मग त्या मोबाईल रुपी बकासुर शी दोन हात करू द्या. आणि होऊद्या आजचे *बकासुरन* ..
Comments
Post a Comment