अद्भुत मेघालय

                  *अद्भुत मेघालय*
कामानिमित्त सध्या भारत-बांग्लादेश भारत -नेपाळ सीमेवर सतत जात आहे. भूसीमेवरून होणारा व्यापार (land border) हा भारतीय गृहमंत्रालाय अंतर्गत येतो. या सीमेवरून आपल्या देशात काहीही देशविघातक जसे की अण्वस्त्र चे कच्चा माल, nuclear आणि रेडिओअकटीव्ह मटेरियल येऊ नये यासाठी detection सिस्टिम आम्ही बसवत आहोत. आपले सैनिक आपले आणि देशाचे संरक्षण करत करत आहेत आणि ते सुरक्षित राहावे म्हणून मला काम करायची संधी भेटत आहे याचा आनंद वाटतो. 
  तर या कामाचा भाग म्हणून मेघालय मध्ये शिलॉंग जवळ डॉकी नावच भारत बांगलादेश सीमेवर गाव आहे हा संपूर्ण परिसर जवळ जवळ 150 किमी अंतर हे फक्त फक्त डोंगर  दऱ्यानी व्यापले आहे. त्याला म्हणतात ज्यांटिंग हिल्स. सर्वात जास्त आणि बारा महिन्यात कधीही कोसळणारा पाऊस त्यामुळे सदाहरित आणि दाट जंगले. तीही उंच आणि सरळ सोट असणाऱ्या पर्वतावर. त्यामुळे जनजीवन कमी आहे. जी मनुष्य वस्ती आहे ती थोडेसे प्रगत झालेल्या आदिवासी लोकांची. 
डॉकी च्या आजूबाजूला नैसर्गिक अधिवासात राहतात ती प्रजाती आहे खासी प्रजाती. आम्ही यातीलच एका आमच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर राहिलो. अतिशय नम्र, प्रेमळ आणि साधीभोळी स्त्री आणि पुरुष आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी तुम्हाला स्त्रिया काम करताना दिसतील. त्यांच्या हाताखाली पुरुष काम करतात.  अनेक नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी इथे समजल्या. 
मेघालय तसे ही स्त्रीप्रधान संस्कृती जपणारे राज्य आहे. 
1.इथे लग्न करून पुरुष स्त्री च्या घरी जातात. 
2. इथे जमीन, घर हे स्त्री च्या नावावर असते आणि ते वंशपरंपरेने मुलीचा अधिकारात असते. म्हणजे संपत्ती ही वडिलोपर्जित नाही तर आईपर्जित असते.
3. जर घरात पुरुष मोठा असेल आणि लहान बहिणी लहान असतील तर लग्न होऊन गेल्याला पुरुषाला आपल्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत सांभाळ करावा लागतो.
4. जास्त बहिणी असतील तर जी लहान असते तिच्या नावावर ते आईचे घर होते.  
5. लग्न झाल्यावर ही पुरुष जर चांगली कमाई करत असेल तर माहेरी त्यातील काही अंशी देणे बंधनकारक असते.
6. लग्नानंतर जर जर पुरुष व्यवस्थित राहत नसेल तर  स्त्री त्याला सोडू शकते (जे खूप क्वचित होते) मेघालय मध्ये विभक्त होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. 
हे माहिती झाले तेव्हा समजले खर स्त्री सशक्तीकरण कसे असते ते. 
डॉकीला भरभरून निसर्ग लाभला आहे. आशिया खंडातील सर्वात स्वच्छ नदी उमरगम जिला डॉकी नदी ही म्हणतात ती इथे आहे. भारत बांगलादेश सीमा या नदीवर आहे. सुपारी, जंगली बदाम, खायचे पान, वेलची यांचं नैसर्गिक उत्पादन इथे होते. खनिज संपत्ती भरभरून आहे पण अजून खोदकाम करण्यास जास्त परवानगी नाहीये. इथे 6 दिवस राहून नदीत कॅम्पिंग करून इथली हवा अनूभवून, नैसर्गिक झऱ्याचे पाणी जे झाडांच्या मुळातून खाली पडते आणि ते आपण आपल्या ओंजळीत घेऊन पितो ते अद्भुत अनुभव देते. इकडेच नदीवर झाडांच्या मुळांनी नैसर्गिक पूल तयार झाला आहे ज्याला live रूट ब्रिज म्हणून प्रसिद्धी आहे, तो यावेळी बघायला नाही जमले पण पुढच्या वेळी नक्की तो बघणार.
खरा निसर्ग काय असतो, स्वछता काय असते, स्त्रीप्रधान संस्कृती काय असते, आनंदी आणि साधीभोळी माणसं कशी असतात हे अनुभवायचं तर मेघालय नक्कीच ती संधी देते. 
धन्यवाद
जयंत जगताप
शिलॉंग- डॉकी, मेघालय 


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)