शंकर रघुनाथ गोळे वाढदिवस

💐💐💐🎂🎂*वाढदिवस अभिष्टीचिंतन*🎂🎂💐💐💐 
 शंकर इंजिनिअर.. गावात आणि सातारा भागात प्रसिद्ध असे नाव. 
महू गावचे सुपूत्र *श्री. शंकर रघुनाथ गोळे*. 1985 मधेच आपलं प्राथमिक शिक्षण पाचवी पर्यंत गावात पूर्ण करून 5 सहावी पासून पुढे तळदेवला हॉस्टेल राहून दहावी आणि नंतर सातारा मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातुन सिविल इंजिनीरिंग पूर्ण केले. लहानपणापुसनच मेहनत आणि काहीतरी उत्कृष्ट करायचे ही जिद्द असलेला शंकरला मार्गदर्शन मिळत होते ते त्याच्या रवी रांजणेमामाकडून. 
1994 मध्ये शिक्षण पूर्ण करून काही काळ नोकरी करून शंकर दादा यांनी स्वतःचा रवी रांजणे सोबत गीता कन्स्ट्रकॅशन व्यवसाय सुरू केला आणि हाहा.. म्हणता सातारा-पुणे भागात एक विश्वासू बिल्डर म्हणून नाव लौकिक मिळवला आहे.  आतापर्यत 500 पेक्षा जास्त बंगले आणि इतर बिल्डिंग ची कामे शंकर दादा नी यशस्वी पणे पूर्ण केली आहेत. 
व्यवसायाकडे लक्ष देत आपले सामाजिक कार्य ही त्यांनी सतत चालू ठेवले आहे. वैयक्तिक प्रगती साधत जो समाजासाठी झटतो तो व्यक्ती नक्कीच वेगळा ठरतो. 
स्वतःची जन्मभूमी असलेल्या गावातील काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार कामात कोणतेही शुल्क न घेता आपले कर्तव्य समजत एक उत्कृष्ठ मंदिर कसे उभे राहिले यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. मंदिराकडे लक्ष देता यावे यासाठी स्वतःची व्यावसायिक कामे देखील ते सातार मध्ये न राहता गावात राहून हाताळत आहेत. सोबत आपले भावकीचे नवलाई देवी मंदिर सुद्धा बांधून सुशोभित करण्यात मोलाची भूमिका बजावली.
*अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि महू गावचे नाव सातारा भागात रोशन करणाऱ्या श्री. शंकर दादा याना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा.*
*शुभेछुक : श्री गणेश मित्र मंडळ महू*

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)