a day to remember १.३.२०२४

  *A day to Remember ०१ मार्च २०२४*
 आठवडाभर भारत-बांगलादेश सीमेवर होतो.  सकाळी-सकाळी आम्ही तिघे कंपनीचे सहकारी शिरीष, निहाल आणि मी व सोबत आमचा बहुआयामी टेक्निशियन श्याम ७ वाजता उठायचे आणि आणि हॉटेल बाहेर समोर असणाऱ्या एका चहाच्या टपरीवर जायचे आणि आमची चाहची ऑर्डर द्यायची. बर. तिघेही वेगळं वेगळं सांगायचो. नीहाल नॉर्मल दूधआणि साखरेचा, शिरीष फक्त दुधाचा बिना साखरेचा, आणि मी लाल चहा साखरे सोबत. बोनगाव तस सीमेवरील तालुक्याचं ठिकाण, सकाळी सकाळी रस्ते मोकळे, मोकळी हवा आणि त्यात गरम चहा. अह..ह..ह..  सुखद अनुभव. मग तयार होऊन सीमेवर जाऊन, पोर्ट हाताळणाऱ्या मुख्य आयपीएस अधिकारी बरोबर मीटिंग करून भारताच्या रक्षणार्थ लागणारी मशीन लावली. बीएसएफ जवान, कस्टम अधिकारी सोबत सिव्हिल च काम करणारी तरुण पोर अस एकंदरीत विविध प्रकारच्या लोकांशी भेटून दुपारी कोलात्याकडे प्रस्थान केले. साईट वर काम करताना सहकारी सोबत असले की काम कसे होऊन जाते कळत नाही. असच मजाक मस्ती करत आम्ही कोलकाता एअरपोर्ट वर पोहचलो. उद्या वाढदिवस आहे आणि मनोरमा सतत माझी वाट बघत आहे तिची उत्कंठा मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होती.
चेक इन करून आम्ही तिघे लाउंज मध्ये बसून काही महत्वाचं काम संपवलं, थोड खाऊन मी निघणार इतक्यात निहाल आणि शिरीष ने तेथील एक पेस्ट्री केक आणून माझा उद्याचा म्हणजे २ मार्चचा वाढदिवस आजच साजरा केला. अस वेगळेपणाने आनंद साजरा करून flight ✈️ मध्ये बसायला येत होत तर समोर मला लिअँडर पेस - भारताचा उत्कृष्ट टेनिस खेळाडू दिसला. विमानात जायला गर्दी होती म्हणून तेव्हा काही बोलता आले नाही. तो प्रीमियम bussines क्लास मध्ये बसला आणि मी माझ्या सीट वर गेलो. 
विस्तरा ही विमान कंपनी टाटा ची आहे आणि तिने तिचा दर्जा पण तसाच उच्च ठेवला आहे, त्यात ती माझी आवडती विमान कंपनी. उच्चप्रतीची विमानसेवा देणारी ही कंपनी आहे. मस्त पैकी आपातकालीन सीट निवडली होती जिथे जास्त जागा असते. उत्कृष्ट जेवण दिले सोबत केक आणि नंतर एक छान आसामी ब्लॅक टी ☕ पिला. 
मग गेला एक आठवडाभर सोबत घेऊन फिरत होतो आणि वाचायची बाकी  राहिलेली,  पुढारीची बहार ही  पुरवणी जॅकेटच्या खिशातून बाहेर काढली, विमानात लाईट बंद केले की एक रीडिंग लाईट असते ती चालू केली आणि पुतीन ते दुबईतील हिंदू मंदिर ते टी२० का रणजी ते इस्त्रोची मोहीम ते मराठा आरक्षण ते शेतकरी मोर्चा की मानसिक संतुलन असे अनेक विषय असलेली पुरवणी वाचून काढली.
तो संपेपर्यंत शेजारील प्रवासी मस्त झोप काढून उठला होता. त्याच्याशी गप्पा सुरू केल्या आणि समजले तो मोठा हिरे व्यापारी आहे. मुंबईत २ आणि कोलकात्यात १ असे त्याचे ३ शोरुम आणि १ कारखाना आहे. त्याने अनेक त्याचे फोटो राजकीय नेते व मोठे व्यावसायिक सोबत काढले ते दाखवले. मग त्याने त्याचे कार्ड देऊन मला भेटायला बोलवले. 
हे सर्व होता होता मला परत लिअँडर पेस आठवला आणि त्याच्यासोबत फोटो घ्यायचा हे ठरवले. सरळ आपण जाऊन त्याला विचलित करणे योग्य राहणार नाही हे ओळखून मी एअर होस्टेसला बोलवले, त्याला माझा हेतू सांगून लिअँडर पेस ची परवानगी घ्यायला पाठवले. थोड्या वेळात तो आला आणि मला विमानाच्या केबिनकडे जायला सांगितले. तिथे अगोदरच ते उभे होते समोर एक विमान परिचारिका उभी होती. मी त्याला बघून त्याच कौतुक करत हस्तालंदोन केले आणि त्याने मला माझा फोन समोर देऊन आमचा फोटो काढायला सांगितला. आता रात्रीचे १२ वाजले होते आणि माझा वाढदिवस सुरू झाला आहे. 
अशाप्रकारे आजचा दिवस अनेक प्रकारचे अनुभव, आनंद, उत्कंठा, नॉलेज देणारा ठरला. 
म्हणून हा दिवस लिहून आठवणीत ठेवायचा आहे. 

धन्यवाद
जयंत जगताप


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)