कोपरी गाव आणि नवी मुंबईकर
*कोपरी गाव आणि नवी मुंबईस मानाचा मुजरा*
भारतात सर्व धर्म अगदी गुण्यागोविंदाने राहतात. जेव्हा जगभर भारत इतका सहिष्णू कसा हे सांगण्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते की 13 व्या शतकात जेव्हा पर्शियन लोक स्वतःचा जीव वाचवून भारताच्या किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांना येथील राजा ने जमीन दिली आणि त्यांचा धर्माची पूजा करण्याची त्यांना संपूर्ण परवानगी दिली. ती संस्कृती इथल्या प्रतेक गावात रुजली आहे.
असच दर्यादिल गाव म्हणजे नवी मुंबईतील कोपरी गाव.
३० वर्षापूर्वी यांचे ही गाव नैसर्गिक अधिवासात होतीत. त्यांचेकडे ही शेती, शुद्ध हवा, गुर ढोर, नद्या, झाडी जंगल, मासेमारी व्यवसाय, मोठी घर, आणि गावच वातावरण होत. मुंबई वर वाढतं चाललेला ताण देशाला आणि राज्याला गरज असलेला विकास साधण्यासाठी सरकारने नवी मुंबई स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या मनाने येथील ग्रामस्थांनी आपलं पूर्वापार चालत आलेली आपली जीवनशैली बदलून राज्याची प्रगती आणि विकासाला जागा करून दिली. नवीन नवीन बदल होत गेले, संपूर्ण देशातून लोक इथे येऊ लागले. सर्व जाती धर्म इथे वाढू लागले. त्यांना नवी मुंबई करानी सामावून घेतलं. सुरवातीला गावात सुविधा असायच्या आणि आजूबाजूच्या कॉलनीत पाणी, राशन अशा रोजच्या गरजेच्या गोष्टी उपलब्ध नसायच्या. मी स्वतः कोपरखैरणे गावात रेशनिग साठी जायचो, बोनकोडे गावात पिठाची गरणी असायची.
*असे नवीन लोकांना समावून घेताना जो कमजोर घटक असतो तो म्हणजे तृतीयपंथी. ते देखील स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवायला नवी मुंबईत येऊ लागले. त्यांना अजूनही आपल्या समाजाने हवं तस स्वीकारलं नाही आहे. ते पण माणूस आहेत, निसर्गत त्यांच्या शरीरात जे बदल झालेत ते, ते बदलू शकत नाहीत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. पण आपली समाज मानसिकता अजून सुधारली नाही आहे. आज शासन Inclusion (सर्वांना सामावून घेणे) right to live (प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे) असे मोठे मोठे उपक्रम रबावत आहे. आजही अनेक लोकांना कमी ज्ञान असल्यामुळे तृतीयपंथी म्हणजे एक शाप वाटतो. अशा काळात त्यांना आसरा मिळाला तो कोपरीकरांचा.*
सुरवातीला नानी ही तृतीयपंथी आपलं कुटुंब घेऊन कोपरी गावात आली. माणुसकीने तिला सामावून घेतलं, जेव्हा राहायला घर नव्हत तेव्हा कोपरी ने त्यांना घर दिलं आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. एवढेच नाही तर त्यांच्या देवीचे मंदिर बांधायला जागा दिली. आज या देवीचा या गावावर आशीर्वाद आहे. आज त्यांची संख्या तिथे वाढली आहे, त्यात काही बहुरूपी घुसून या समाजाला बदनाम ही करत असतात. पण जे खरे आहेत ते आपली संस्कृती जपत आहेत, टिकवायचा प्रयत्न करत आहेत, गावकऱ्यांनी त्यांना सामावून घेतल आहे.
शासन जिथे तृतीयपंथी ना मुख्य धारेत कसं आणता येईल यावर अनेक प्रकल्प राबवत आहे तेव्हा कोपरी गावाने याआधीच एक उत्तम उदाहरण उभ केल आहे.
नवी मुंबईतील inclusion आणी right to live हे शासनाचे सामाजिक उपक्रम राबवणारे एक मॉडेल गाव म्हणून कोपरी गावाला प्रकाशझोतात आणू शकतो.
सर्व नवी मुंबईतील गावकऱ्यांनी मोठा त्याग केला आहे यात शंका नाही. दर्यकिनारी राहणारी ही माणसं नक्कीच दर्यादिल आहेत. त्यांना मानाचा मुजरा.. तुमचा त्याग आहे म्हणून आज बाहेरून आलेले सर्व आपल्या गावाकडे जाऊन गावपण अनुभवत आहेत. आणि नवी मुंबई वेगेलेपणासाठी ओळखली जाते ते वेगळेपण जपणारे कोपरी गाव नक्कीच प्रशंसस्नेस पात्र आहे.
धन्यवाद.
जयंत जगताप
Comments
Post a Comment