मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग

मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग 

सर्वांनी दुपारी ४ वाजता भैरवनाथ मंदिरात जमणे, देवाला नारळ फोडणे आणि मग स्थळाकडे जाणे. 
पुरुष ग्रुप photo- 60 वर्ष वरील, 40ते 60 च ग्रुप  30ते 40 च ग्रुप आणि young group. 
तसेच महिलांसाठी याच प्रकारे फोटो सेशन.  

गणेश पूजन, शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन 
नितीन गोळे जॅक्सन, अमोल गोळे गुरू, सुनील शिंदे, राजेंद्र विष्णू गोळे.



जय:
सकारात्मकता निर्माण करणे... मनाला प्रसन्न वाटेल असे काम करणे... हे आपल्या हातात आहे. आधी त्या दृष्टीने विचार नंतर त्याला मूर्त रूप देण्यासाठी आचार महत्वाचे आहेत. त्या दृष्टीनं एक एक पाऊल टाकायचं हे आपलं काम आहे. हा स्नेहसंमेलन सोहळा त्या सकारात्मक वाटेवरील एक मैलाचा दगड आहे. 
शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पटकन पारा.
शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधी कधी डोळ्या मध्ये पाणी.

कोणतीही गोष्टीत शेवटचा माणूस सहभागी असावा..आज आपण जमलोय ते शेवटचा माणूस कोण आहे ते शोधायला.. 😀

आदी:
म्हणूनच जो शब्द जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो मैफिल जिंकेल.
मोकाशी शब्द म्हणजे काय?
मो - मोकळ्या मनाची माणसं 
का - कायम समाज उपयोगी  कामात अग्रेसर 
शी - शिस्तबद्ध काम करणारी  संघटना
अशी ही मोकाशी भावकी परिवार आज याठिकाणी जमला आहे, त्या सर्वांचे मी मोकाशी भावकी तर्फे हार्दिक, खूप खूप स्वागत करतो...
सगळ्याच आठवणी कागदावर उतरवायच्या नसतात. 
मनाच्या एका कप्प्यात दाबून भरून ठेवायच्या असतात.
अशाच आठवणी आज आपण इथे तयार करणार आहोत.. 

हर्षदा:
नमस्कार,
करूया की नको करूया, कस करायच, कुठ करायचं.. अशा सर्व प्रश्नांवर उत्तर शोधत शोधत शेवटी आपल्या भवकीच पाहिलं स्नेहसंमेलन आज इथे पार पडत आहे. 
आज आपण सर्व जमलो आहे, अनेकांच्या मनात प्रश्न असतील काय कारण हे गेट together करायचे. लग्नात, पूजेला, सुखदुःखात तर आपण भेटतच असतो की, मग आज विशेष अस काय होणार आहे भेटून..?
जय:
तुमचे प्रश्न बरोबर आहेत, आम्हाला ही हे प्रश्न पडले होते. मग आम्ही सर्वांनी विचार केला, आपली भावकी एवढी मोठी आहे, सर्वजण प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित नसतात,  तसेच तरुण मुलं मुली, नवीन आलेल्या सूना शालेय विद्यार्थी यासर्वांना भावकी म्हणजे नक्की कोण हे समजणे आवश्यक आहे. एकमेकंबरोबर ओळख होणे गरजेच आहे.. जुन्या काळी जेवणाच पाणी भरणे, चारावर जमणे यातून सर्व एकमेकांना भेटत असतं.. आता चर बंद झाले, घराघरात नळ आले किंवा टँकर असतात नाहीतर पॅकिंग वॉटर ची सुविधा आहे. घागरिने पाणी भरणे काय असते ते मंदिर उद्घाटन करताना पुन्हा अनुभवले आणि ते ही पायात चप्पल न घालता..असच अनेक जुन्या गोष्टी मागे पडल्या ज्यातून आपण सर्व एकमेकांना भेटत होतो. काळानुसार विकास झाला आणि तो आपण स्वीकारला आहे. पण म्हणून माणसांची एकमेकांना गरज संपली अस होत नाही.. कितीही प्रगती झाली तरी, मानसिक स्थैर्य, एकमेकांना आधार देण्यासाठी, सुखदुःखत साथ देण्यासाठी नात्यांची गरज असते, आपल्या माणसांची गरज असते, आपल्या हक्काच्या भावकीची गरज असते.. वयस्कर पिढी आणि आताची तरुण पिढी हे अनुभवत आहे पण येणारया आपल्या नवीन पिढी ना हे संस्कार व्हावेत म्हणून आणि जुन्या लोकांनी एकमेकांना पुन्हा एकदा भेटावे म्हणून हा स्नेहसंमेलन कार्यक्रम आहे. 

हर्षदा: अरे बापरे काका, किती जुन्या आठवणी सांगितल्या तुम्ही, आम्हाला तर चर म्हणजे हेही माहीत नाही.
आदी: म्हणून तर आज आपण भेटतोय, आपली भावकी एवढी मोठी आहे की आमची पिढी सर्वांना ओळखत नाहीत. त्यासाठी तर आज आपण जमलो आहे.. 

जय: हे तू बरोबर बोललास, आपल्या वडीलधाऱ्यानी आपला हा वाडा टिकवला आहे. सर्वांना सामावून घेणे, सर्वांच्या सुखदुःखात शामिल होणे, कोणाचं कोणतेही कार्य असो आपली भावबंद, जावा-जावा, सासू-सूना, सर्व एकत्र येऊन ते कार्य पार पाडतात की त्या कार्य मालकाला पण समजतं  नाही कसे पार पडले.
बर.. मला सांग आज एकत्र जमलाय मग काय फक्त जेवण करायचं आणि जायचं एवढंच आहे काय?

आदी: अहो.. काका अस कसं... एकतर पहिल्यांदा अस स्नेहसंमेलन होतंय.. आणि फक्त जेवणावर संपेल अस कस.. 
हर्षदा: मग अजून काय काय आहे..
आदी: आता तर सुरवात आहे.. आता बघाच आमची शाळेतील पोर कस मनोरंजन करतायत ते.. 
हर्षदा: हो.. हो.. थांबा... मला माहित आहे.. आज खूप धमाल आहे.... 
जय: हो हो.. आपल्या सर्वांना माहित आहे.. या कार्यक्रमासाठी आपल्या महिलांनी आणि लहान मुलांनी खुप मेहनत घेतली आहे. 
१.
हर्षदा: आमंत्रित करणे - महिला गणेश वंदन नृत्य:
महिला: मनोरमा जयंत जगताप, नूतन प्रीतीश रांजणे, सुप्रिया राजेंद्र गोळे, स्वाती विलास जगताप, आशा सुनील गोळे, ललिता हणमंत गोळे. 
२. 
आदी: महिलांची तारीफ करणे आणि शिवराय घोष किंवा तारीफ करून  राजे आले गाण्यासाठी रुद्र जगताप व अंशीका जगताप यांना बोलावणे. 
३.
जय: 
अतिशय सुंदर सुरवात झालेली आहे, आता आपण आपल्या कुटुंबाची ओळख करून घेऊया...
१.विष्णू विठल पवार, 
२. बाबुराव गेणू गोळे
३. राजेंद्र विष्णू गोळे
४. भिकू तुकाराम जगताप
५. भानुदास गेणु गोळे.
६. संजय विष्णू गोळे
७. दत्तात्रय किसन गोळे
८. किसन विठ्ठल पवार
९. बाजीराव राजेंद्र गोळे
१०. गुलाबराव कोंडीबा गोळे

४. हर्षदा: आदी आणि रोहित आम्हाला माहीत आहे तुम्ही पण खूप महराजंचे भक्त आहे. एक पोवाडा झालच पाहिजे. आदी आणि रोहित पोवाडा: 

हर्षदा:
५.
११ सुरेश पांडुरंग मस्कर 
१२. वसंत मारुती गोळे
१३. अशोक मारुती गोळे
१४. हरिभाऊ कृष्णा गोळे
१५. रामचंद्र किसन गोळे
१६. पांडुरंग तुकाराम जगताप
१७. सदाशिव आत्माराम गोळे
१८. सुनील जगन्नाथ शिंदे
१९. अमोल आनंदराव गोळे
२०.आनंदराव गणपती गोळे. 

६. 
अनुष्का शिंदे, इशिता रांजणे आणि दिव्या जगताप
तनिष्का आणि मैत्री अजय गोळे
सई सचिन गोळे - झुलवा पाळणा बाल शिवाजीचा
दुर्वा अनिल गोळे, 
विराज संदीप व शौर्य सतीश गोळे
संस्कृती आणि स्वराली गोळे.
प्रश्न:
भावकी म्हणजे काय? मुलांना प्रश्न जो योग्य उत्तर देईल त्याला कॅडबरी बक्षीस.. 

७. 
२१. दिलीप सीताराम शिंदे
२२.हणमंत महादेव गोळे
२३ हणमंत रामचंद्र गोळे
२४. नितीन विठल गोळे
२५. विनायक बाळू जगताप
२६.महादेव सखाराम गोळे
२७. बाळू गेनु चोरट
२८. प्रल्हाद विष्णू गोळे
२९ राम श्रीपती गोळे
३० सुधीर मारुती जगताप

जय 
महिला मंगळागौर कार्यक्रम:
प्रस्तावना 
मंगळागौर म्हणजे काय? गणपतीत महिला जो पारंपरिक खेळ खेळतात तो खेळ, धकाधकीच्या जीवनात देखील आपल्या महिलांनी मुंबई आणि गावी टेक्नॉलॉजी च वापर करून उत्कृष्ट पणे हा पारंपरिक खेळ बसवला आहे. त्यांना साथ दिली आहे ती २ तरुण मुलींनी सुध्दा...
मी आमंत्रित करतो.. 
मनस्वी प्रताप गोळे, शीतल शिवाजी गोळे, नीलम संतोष जगताप, लता दतत्रय गोळे, निर्मला सुनील शिंदे, पूनम निलेश जगताप, शीतल नितीन गोळे,  स्नेहल रणजित गोळे, मनोरमा जयंत जगताप, नूतन प्रीतीश रांजणे, सुप्रिया राजेंद्र गोळे, स्वाती विलास जगताप, आशा सुनील गोळे, ललिता हणमंत गोळे. 

९. 
३१.दिलीप शिवाजी गोळे
३२. मच्छिंद्र नथुराम शिंदे
३३. श्रीनाथ विनायक गोळे
३४. गुलाबराव गणपती गोळे
३५. रमेश दिनकर गोळे
३६ आनंदराव मारुती जगताप
३७. भरत सर्जेराव गोळे
३८. दत्तात्रय मारुती गोळे
३९. शरद शंकर गोळे
४०. दत्तात्रय यशवंत गोळे. 

१०
स्वरा शरद गोळे.
स्वरा सूरज जगताप
श्रावणी सुधीर जगताप.. 
पुरुष खेळ
डोक्यावर पुस्तक घेऊन पळणे 
मुलांचा खेळ घेणे बॉबी खाणे आणि नाचो गाण्यावर नाचवणे. 
गोट्या खेळायचे प्रकार विचारने.. जो योग्य सांगेल त्याला बक्षीस

११.
४१.विलास वसंत जगताप
४२.प्रताप आनंदराव गोळे
४३.महादेव मारुती रांजणे
४४.विठ्ठल नामदेव गोळे (बाबा)
४५. प्रदीप संपत गोळे
४६. आनंदा जगन्नाथ शिंदे
४७. संजय नारायण गोळे. 
४८. अशोक किसन गोळे
४९. बाळासाहेब मारुती गोळे
५०. दत्तात्रय सखाराम गोळे

१२.
महिला खेळ: एका खेळातील महिला दुसऱ्या खेळात खेळू शकत नाही
१. पॅड ने बाल पास करणे.  ८-महिला. २ round. 
२. फुगे फुगवणे आणि ग्लास वर ग्लास लावणे. ५ महिला.  २ round
ललिता गोळे गोसविन कला सादर.. 
राहिलेलं डान्स.. 

१३.
५१.गणपत दिनकर गोळे
५२. शशिकांत मारुती गोळे
५३. लक्ष्मण किसन गोळे
५४. निवृत्ती श्रीपती गोळे
५५. तुकाराम नामदेव गोळे
५६. हणमंत कोंडीबा गोळे
५७. मधुकर लक्ष्मण गोळे. 
५८.उत्तम गेनू चोरट 
५९. मगनलाल मारुती गोळे
६०. अजय शामराव गोळे
६१. सुभाष सदाशिव गोळे
६२ सूर्यकांत दिनकर गोळे
६२. बाळकृष्ण गेनू गोळे
६३. धर्माजी बाजीराव गोळे
६४ जगन्नाथ श्रीपती गोळे
६५ दत्तात्रय महादेव गोळे
६६. शिवाजी नारायण गोळे. 

डान्स 
वेदिका गोळे आणि टीम ग्रुप डान्स. 

विद्यार्थी गुणगौरव सोहळा सन २०२२-२०२३.
१) शितल शिवाजी गोळे -पदवी.
२) ऋषिकेश सुनिल गोळे -पदवी.
३)साहिल दिलीप गोळे -बारावी.
४)वरद सुशिल गोळे -दहावी.
५) वैष्णवी सुभाष गोळे -दहावी.
६) हर्षदा भरत गोळे -दहावी.
७) ईश्वरी दत्तात्रय गोळे -दहावी.
८)अभय अतुल जगताप -दहावी.
९) मनस्वी प्रताप गोळे -दहावी.
१०)सुजल दत्तात्रय गोळे -दहावी.
 ११) पुर्वा रविंद्र रांजणे.बी. आकिर्टेक्ट.एम बी ए.पुणे.
१२)श्रेया मधुकर गोळे.-दहावी.
१३) प्रथमेश प्रल्हाद गोळे -दहावी.
१४)साक्षी रामचंद्र गोळे -बी एसी कम्प्युटर सायन्स -पदवी
१५) समाधान मधुकर गोळे- मेकेनिकल इंजिनिअर -पदवी.
१६) संजीत दत्तात्रय गोळे - दहावी.

(विशेष सत्कार)
१)वनश्री विनायक गोळे.पहिली महिला पोलिस महू.

शेवटी फ्री डान्स.. महिलांसाठी... 




जर पाऊस आला तर sound system लगेच मंदिरात हालवणे. Dy चा टेम्पो रेडी ठेवणे. 




लागणारे साहित्य
समई, गणेश फोटो, महाराज फोटो, हार,  बॉल, writing pad, बादल्या, फुगे, कागदी ग्लास, गोट्या, कॅमेरा  २  पेपर फटाके, कॅडबरी विजेत्यांना, छोटी Cadbury बॉबी packet सहभागी स्पर्धकांना, खेळाचे साहित्य.. 
महिलांना गिफ्ट.. steel पाणी बॉटल.. 

















Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)