भीती हि खरी नसते fear is not real


   
#cinema gulli #सिनेमागल्ली 

Fear is not Real.. 
जो घाबरला तो संपला.  जो डर गया वो मार गया.. डर के आगे जीत है..  ज्याने भीती वर मात केली त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते असे अनेक सकारात्मक संवाद आपण ऐकलेले आहेत. भीती वर मात करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल अस सांगितलं जातं आणि अनेक जण त्यासाठी प्रयत्न ही करत असतात.. पण खरोखर एकदा भीती संपली माणूस काय करू शकतो यासाठी हॉलिवूड मध्ये एक खूप सुंदर सिनेमा बनवला गेला आहे. असच एकदा टीव्ही वर चॅनल स्क्रोल करताना स्टार मुव्हीज वर हा सिनेमा चालू होता आणि बघतिला. सिनेमाचा आशय होता भीतीवर मात केली की माणूस कसा यशस्वी होतो. मग त्यासाठी तुम्ही ताकतवान असणे गरजेचे नसते. धाडसी असणे गरजेचे असते. 
सिनेमाच्या ट्रेलर मध्ये खूप छान संवाद आहे.. fear is not real.. danger is real but fear is product that you brought. It's your choice to be live with fear or face the real.
भीती ही आपण आणलेली असते, संकटे खरी असतात त्यांच्याशी दोन हात केले की आपण जिंकू शकतो पण भीती ही काल्पनिक असते ती संपवता येत नाही तिला संपूर्ण नाकरावी लागते. 
सिनेमा च नाव आहे after the earth.. विल स्मिथ आणि त्याचा मुलगा जेदन स्मिथ यांचा हा सिनेमा.. वडील आपल्या मुलाला कसा घडवतो यावर ही प्रकाश टाकतो. तरुण मुलांनी नक्की बघावा आणि काहीतरी शिकावे असा हा सिनेमा आहे. 
आशय इथे सांगितला आहे story trailer मध्ये बघा. 

डर के आगे जीत है.. 
https://youtu.be/CZIt20emgLY?si=-E9ygB4cb0aGa7dl

लेखक
जयंत जगताप


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)