आसाम रायफल

              *आसाम रायफल*
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतीय सेना कशी बदलली यावर 2019 साली एनडीटीव्ही वर एक रिटायर्ड मेजर मुलखात देत होते, एका साईट वर गेस्ट हाऊस मध्ये बसून लॅपटॉप वर काम करत करत ती मुलखात ऐकत होतो. भारतीय सेनेच्या एक किस्सा ते मेजर सांगू लागले आणि मी काम सोडून कान लाऊन ऐकू लागलो. 
 पूर्वी पाकिस्तानी सेना आपल्या चौक्यांवर गोळीबार करायचे आणि आपण वरून आदेशाची वात बघत बसायचो.  मोदी सरकार सत्तेत आले आणि काही महत्वाच्या ठिकाणी बदल झाले. त्यात एक अग्रेसिव म्हणजे सरळ अटक करणरी बटालियन म्हणजे आसाम रायफल ची एक तुकडी पाकिस्तानी बॉर्डर वर तैनात करण्यात आली. 
मेजर एकदा तिथे भेट द्यायला गेले होते तेव्हा तेथील कमांडरल विचारले "कैसा हाल है अब, बिना मतलब की firing नाही ना होती हम पर"
कमांडर फक्त बोलला आयिये दिखता हू. आणि पोस्ट चे आत मध्ये नेले आणि मशीनगण वाल्याला काहीतरी ऑर्डर दिली.  5 मिनिटे शांतता पसरली आणि आपली मशीन गण पाकिस्तानी पोस्ट वर आग ओकू लागला. 5मिनिट अटॅक करून गनमेन थांबला. 
आता कमांडर बोलला "ऐसा है हाल मेजर, अब आदेश उन्हे लाना पडता है हम पे firing करणे का"
हम रायनो (एकशिंगी गेंडा) है. (आसाम रायफल चे हे चिन्ह आहे.) "हम पार कोई आख उठाये तो उसे हम उखाड देंगे."ते ऐकून मी आसाम रायफलच फॅन झालो.       2023 पासून भारतीय सेनेचे प्रोजेक्ट वर काम करायची संधी भेटली आणि देशाच्या अनेक सीमांवर जाऊन प्रत्यक्ष सेने बरोबर राहायची आणि काम करायची संधी भेटत गेली. अनेक बटालियन भेटल्या पण मनात कुठेतरी आसाम रायफलची भेट व्हावी ही इच्छा होती. अनेक सीमा फिरून दवरा निघाला मणिपूर मध्ये म्यानमार बॉर्डरवर. अगोदरच तिथे हिंसाचार सुरू होता. तो थोडा शांत झाला की धाडस करून मी आणि शिरीष इंफाळ एअरपोर्टवर दुपारी 4 वाजता उतरून मोरेह सीमेवर निघालो. एकूण अंतर 120 किमी पण पूर्ण घाट. शहरसोडे पर्यंत अंधार पडू लागला, लोकवस्ती विरळ झाली, घाट सुरु झाला आणि आमच्या मनाची धाकधूक वाढू लागली. एक पोलिस चेक पोस्ट क्रॉस केली आणि रस्त्यावर घाटात फक्त आमचीच गाडी धावत आहे हे आम्हाला समजले. 25 किमी घाट चढलो आणि तिथे जंगलात  अंधारात एक मोठा मिलिटरी बेस दिसला.चेक पोस्ट वर गाडी थांबली. गाडीतून उतरलो आणि समोर धीपाड जवान उभा होता माझं लक्ष गेले ते त्याच्या छातीवरील चिन्ह आणि नावावर. *आसाम रायफल आपके सेवा मे*. त्या भयावह परिस्थिती मध्ये पण मी चमकलो आणि आनंदित झालो. मणिपूर ची सुरक्षा आसाम रायफल सांभाळत होती. 
पुढे मोरेह साईट वर जाऊन तेथील काम करत असताना तेथील आयसीपी मॅनेजर खास मित्र झाला आणि त्याने मला ते आसामचे पारंपरिक चिन्ह एकशिंगी गेंडा भेट दिला. तो मी मोठ्या अभिमानाने सोबत घेऊन आलो. 
Salute to आसाम रायफल आणि भारतीय सेना. 

लेखक
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)