मंदिर उद्घाटन सोहळा दिवस तिसरा

          *मंदिर उद्घाटन सोहळा दिवस तिसरा*
मिती मर्गशिष शुद्ध १४ शके १९४५ सोमवार दिनांक 25 ते 27 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेला हा अद्वितीय सोहळा म्हणजे महू गावच्या काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा. 
गेल्यावर्षी 25 26 27 डिसेंबर रोजी आपल्या गावाने एक अद्भुत असा सोहळा पार पाडला. येणाऱ्या अनेक  पिढ्या या क्षणानाच कौतुक करतील असा हा काळभैरवनाथ मंदिर जीर्णोद्धार सोहळा पार पडला होता. 
पहिले 2 दिवस, मिरवणूक आणि शाही स्नान पार पडले होते. संपूर्ण परिसरात संस्कृत श्लोक उच्चार आणि भक्तिमय वातावरण झाले होतें. 5 आलेले उच्च विद्या विभूषित संत महात्मे विविध विधी आणि मंत्रोऊचार करत वातावरण शुद्ध करत होते.  गावचे मालक महाराज काळभैरवनाथ सोबत वज्रेश्वरी माता, श्रीगणेश महाराज आणि रामभक्त हनुमान मंदीरात आराम करत होते. तिसरा दिवस होता तो 101 कलश पूजन आणि देवांनी आसनस्थ होण्याचा. या विधी साठी जसे दुसऱ्यदिवाशी पुरुषांनी जल आणले होते तसे आज महिलांनी नदीवरून जल आणायचे होते
गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहात नदीवरून जल आणले आणि कलशपुजनासाठी अनेक मोठी पातेली पाण्यानी भरली.
त्यांनतर गावात आगमन झाले ते *विद्यत्मक जंगली महाराज आश्रम अंबवडे चे परमपूज्य संत ब्रम्हानंद महाराज यांच्या हस्ते सर्व कलशांचे पूजन झाले, कलश रोहन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण झाला.*
त्यानंतर आलेले सर्व मान्यवर, माहेरवाशिणी आणि पाहुणे यांचा येथेच्छ सत्कार समारंभ पार पडला आणि महाप्रसाद वाटप करत कधी रात्र झाली ते समजले नाही. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात काळभैरवनाथ जयघोषात भारावले होते. 
त्यासोबत सुरू झालेला सप्ताह या आनंदाला द्विगुणित करत होता. 
आज या जीर्णोद्धार कार्याचा प्रथम वर्धापन दिनी सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा.. 

बोला *काळभैरवनाथच्या नावाने चांगभलं*




Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)