महू गावच्या पारायणचा गाभा

महू गावच्या पारायणचा गाभा
रामकृष्ण हरी माऊली
पारायण म्हटले की डोळ्यासमोर येते ते पहाटेची काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, हरिपाठ आणि मग सर्वप्रचीत असे कीर्तन. यासोबत सतत 7 दिवस 24 तास वीणा हातात घेऊन करायचे पारायण. 
महू गावात 1940 साली सुरू झालेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आता 84व्या वर्षात पोहचला आहे. काळानुरूप यात नवीन पिढी येत गेली नवीन हरिभक्त तयार होतं आहेत. गाव 7 दिवस हरिभक्तित तल्लीन होत आहे. आता तर गेल्या काही वर्षापासून सतत 7 दिवस संध्याकाळी भजन मंडळसोबत सर्व गावाला पंगत भेटत आहे. 
यासर्व बदला मध्ये या पारायणचा गाभा बनून जे हे कार्य करत आहेत ते म्हणजे *ह.भ. प. गुलाबराव कोंडीबा गोळे (दादा)* 
सर्वांचे लक्ष असते किर्तनाकडे आणि ते गरजेचे ही आहे. परंतू पहाटे पासून संपूर्ण दिवसभर ही माऊली तिथे भक्तीत तल्लीन असते.  80 वर्षाचे असलेले भाऊ गेले कित्येक वर्ष कमीत कमी 45ते 50 वर्ष तरी यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी पारायण सुरु आहे. यांना व्यासपीठ चालक म्हणून ओळखले जात असले तरी यांच्या इतका ज्ञानेश्वरीचा उत्तम अर्थ कोणी सांगेल असा व्यक्ती भागात नसेल. असे हे  सोबत भागवत धर्माचे दाखले, गीतेचा अर्थ. विविध ग्रंथातील संदर्भ हे करत करत वातावरण भक्तिमय करून सोडतात. बर अस नाही की हे चालक आहेत तर यांचाच आदेश चालेल, सर्वांना वाचन करायला उस्फुर्त करतात.
मी स्वतः 2004 साली यांच्या मार्गदर्शनात वाचन केले होते.
 वाचकांच्या अनेक पिढ्या आलाय आणि गेल्या. . पण जसे समुद्रात बोटींना दिशा दर्शक म्हणून दीपस्तंभ असतात तसे महू गावच्या पारायणचे दीपस्तंभ म्हणून ह. भ.गुलाबदादा खंबीरपणे उभे आहेत. आणि येणारे अनेक वर्ष राहतील यात शंका नाही. 

आपले गावचा सप्ताह वर्षगणीस वरंदिगत होत असताना त्यांचा देखील येथेच सन्मान होणे गरजेचं आहे असं अनेक हरिभक्ताना वाटत असते. याचा विचार व्हावा हीच विट्ठल चरणी प्रार्थना. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)