*जिल्हा परिषद शाळा महूचा विजयरथ*

         *जिल्हा परिषद शाळा महूचा विजयरथ*
म्हणतात ना एकदा चांगल्या कामाला सुरवात झाली की मग ते अविरत पणे चालत राहते. तसेच काहीसे जिल्हा परिषद शाळा महूचे कार्य सुरू आहे. अनेकानेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आत्ताच तालुकास्तरावर सुंदर शाळा म्हणून दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता शाळेचे नवीन इमारतीचे काम जोराने सुरू आहे. भविष्यात मुलांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून शाळा समिती आणि ग्रामस्थानी शाळेत पाण्याची बोर घ्यायचे ठरवले आणि जणू काही *ज्ञानंगंगेच्या दारी जलगंगा* अवतरली इतकं जबरदस्त पाणी इथे लागले.
आता शाळेल्या पहिल्या क्रमांकाने जिंकून आणण्याचा मानस शाळा समितीने, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी केला आहे. 
अतिशय जोमाने चाललेल्या या उपक्रमाचे अभिनंदन आणि सर्व झटणाऱ्या लोकांचे आभार. 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)