वंदना मावशी एक कर्मयोगी


वंदना मावशी एक कर्मयोगी 
3 तारखेला झालेल्या अपघातात आकस्मिकपणे आपल्यातून विकास देवाघरी निघून गेला. काल तेरावा झाला आणि आपल्या हिंदू मान्यतेनुसार त्याचा स्वर्गाकडील प्रवास सुरू झाला. 
अतिशय खडतर अशा परिस्थितीतून मावशीने तिचा संसार उभा केला. नीलम रूपी कन्येच्या पाठीवर मोठ्या मुलाचे नाव विकास आणि धाकट्याचं आकाश ठेवले. आणि खरोखर विकासला मोठे करत करत घरचा विकास असा केला की आकाशाला गवसणी घातली. काबाड कष्ट केले. एकटीने शेती, घर, सासू सासरे सांभाळत संसार उभा केला. कडकडीत काटक अशी शरीरयष्टी, सगळ्यात मोठा भाऊ आणि त्यावर चार बहिणीत सगळ्यात लहान अशी ही वंदना मावशी. लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपल आणि भावाने हिचा सांभाळ केला. 3 बहिणीच लग्न होईन सासरी गेल्या आणि ही भावाच संसाराचा आधार बनून आधी माहेरी राबली. शेती, भाती घर चालवणे लहान वयातच शिकली. लग्न होऊन पानसत आली. एकुलता एक मुलगा असलेला नवसऱ्याच्या घरात सून म्हणून आली आणि घरचा कायापालट केला. नीलम, विकास आणि आकाश रुपी पुत्ररत्न झालीत. सासरकडील पाहुणे खूपच कमी अगदी नसल्या सारखीच. तेव्हा हिला आधार भेटला तो तिच्या बहिणींचा. हिच्या बहीणी हिचे आई आणि दाजी वडील म्हणून पाठीशी उभे राहिले. मावशी देखील कुठे मेहनत करायला कमी पडली नाही. मुलांना मोठं केलं, प्रत्येकच बारावी पर्यंत शिक्षण केलं. मुल ही कष्टाळू वृत्तीची आहेत. विकास ने 12वी नंतर स्वबळावर नोकरी धंद्यात मोठा पल्ला घाटला. अगोदर हणमंत मामाच्या कंपनीत काम शिकला मग दुसऱ्या कंपनीत अजून मोठा पदावर प्रगती केली. शिक्षण कामिनसले तरी हुशारीने मॅनेजर झाला आणि मोठी टीम हाताळत होता. 
मावशीच्या मेहनतीच्या झाडाला आता फळ लागली आणि एक फळ आकस्मित पणे गळून पडले आहे. 
पण हा वटवृक्ष पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)