पहलगाम
एक सामान्य माणसाचे विचार.
4 दहशतवादी आले, 26 निरपराध पर्यटकांना धर्म विचारून, नाही अमानुषपने चेक करून मारले आणि गायब झाले. 15 दिवस जोरदार तयारी केली. बदला घ्यायचा हे ठरले आणि आतंकवादी ठिकाणावर हल्ले केले. मेले ते दहशतवादी आणि त्यांना पोसणारे म्हणजे ते पण दहशतवादीच. पाकिस्तान ने मग सरळ हल्ले सुरू केले आपण ते थोपवले आणि फक्त प्रतिक्रिया दिली. तेआपल्या नागरी वस्ती वर, सैन ठिकाणावर बेछूट हल्ले करत राहिले. आपण फक्त हे डिफेन्स तोडले, ते infrastructure पाडले, te स्टेटियम पाडले हे सांगून स्वतःची पाठ थोपवून घेत राहिलो. आपण हल्ले करू नये म्हणून ते नागरी विमान उडवत राहिले आणि आपण त्याचे फोटो दाखवून त्यांनी कसा चिडीचा डाव खेळला हे सांगत राहिलो. त्यांनी आपली ताकद तपासली, ओळखली आणि शेवटी माघार घेतो सांगितले आणि आपण तयार झालो. यात आपण फक्त रिऍक्टिव्ह मोड मध्ये राहिलो. ते खेळवत राहिले आणि आपण प्रतिसाद देत राहिलो. शेवटी अमेरिका मुतली, आणि त्याला पाऊस दाखवून आपण जिंकत असलेली मॅच ड्रॉ घोषित केली. त्यात अमेरिकेचे मूत्र गोड मानत त्यांनी 9000 हजार कोटी खिशात घातले.
आपल्याला अजून सख्त व्हावे लागेल. त्यांनी मारून झालंय, आता आपली वेळ आहे. ते नागरी वस्त्या सोडत नाहीत तुम्ही ही सोडू नका. न मारून तुमचा चांगुलपणा कोणाला नाही बघायचा. आता तांडव बघायचं आहे. Pok घेऊन आपला खरा नकाशा पूर्ण करा.
जय हिंद..
जयंत जगताप
Comments
Post a Comment