पृथ्वी आणि जीवन

                 पृथ्वी आणि जीवन
आपली पृथ्वी किती वयस्कर आहे. इथे कसे कसे जीवन तयार झाले याबद्दल विचार करत होतो आणि यूट्यूब वर याबद्दल काही व्हिडिओ बघत होतो. काल दीड तासाचा एक मोठा व्हिडिओ बघितला त्यात पृथ्वीची संपूर्ण गोष्ट संक्षिप्तपणे सांगितली आहे. संक्षिप्त यासाठी म्हटले कारण पृथ्वीचा इतिहास 450 कोटी वर्षाचा आहे. हो साडेचारशे कोटी... त्यात माणसाचा इतिहास फक्त गेल्या 9 लाख वर्षाचा आहे.. डायनासोर चे इथले अस्तित्व 25 कोटी वर्ष होते.  पहिल्यापासून इतिहास बघू. 
पृथ्वी निर्माण झाल्यानंतर 20कोटी वर्ष इथे कसलेच जीव नव्हते. वातावरण फक्त कार्बन आणि मिथेन आणि इतर वायूनी व्यापले होते. त्यानंतर 20कोटी वर्ष पृथ्वीवर वादळ, धुळीचे लोट, उच्च तापमान असेच वातावरण होते. हळूहळू सौरमंडळातून इतर धुळीचे कण इथे यायला लागले ते सोबत सूक्ष्म स्वरूपात पाणी घेऊन येत होते. ही प्रक्रिया 4ते 5 कोटी वर्ष सुरू होती. त्यामुळे हळू हळू इथले तापमान कमी होऊ लागले. इथले धुळकन आणि बाहेरून आलेले कण मिळून स्थिर होऊ लागले त्यातून मग इथे पाणी जमू लागले. काही कोटी वर्षांनी इथे समुद्र तयार झाले. त्यात मग एकपेशीय जीव अस्तिवात आले. 2 कोटी वर्षांनी त्यात अनेकपेशीय जीव तयार होऊ लागले. हे जीव श्वास म्हणून कार्बन घ्यायचे आणि ऑक्सिजन सोडायचे. त्यामुळे हळू हळू वातावरण थंड होते गेले. हे जीव इतके वाढले की हळू हळू पृथ्वीवर शीत लाट आली आणि इथेल जीवन 90% नष्ट झाले. काही लाख वर्ष असेच पाहिले शीत युग सुरू होते. मग परत हळू हळू तापमान वाढू लागले. शीतयुगात तग धरून राहिलेले स्मुक्ष जीव पुन्हा वाढू लागले. सुरवातीला 100 कोटी वर्ष पृथ्वीवर फक्त पाण्यात जीवन होते. जमीन थोडी होती ती पूर्ण पण निर्जीव होती. 2 -3 कोटी वर्षांनी समुद्रात अनेक महाकाय ते अगदी स्मुक्ष असे मासे तयार झाले होते. समुद्रात शेवाळ तयार होऊन हळू हळू ते किनाऱ्यावर आले आणि प्रथम त्याचा संपर्क मातीशी झाला. मग हळूहळू जमिनीवर कार्बनडाय ऑक्साईड घेणारे आणि ऑक्सिजन सोडणारे गवत, छोटी झाडे ते मोठी झाडे तयार होऊ लागलीत आणि पृथ्वीवर जंगल तयार झालीत. त्यानंतर अनेक हजारो वर्षांनी पृथ्वी पूर्ण जंगलांनी व्यापली गेली होती. समुद्रात महाकाय जलचर तयार होत होते. त्यात काही छोटे छोटे हातपाय असलेले जीव सुद्धा होते जे कालांतराने जमिनीवर येऊ लागले. जसे की आजचे मगरी, कासव आणि बेडूक जे या पृथ्वीवरील सर्वात जुने टिकलेले प्राणी आहेत. 
वनस्पती खाणारे जलचर हळू हळू जमिनीवर राहू लागले आणि त्यांच्या शरीरामध्ये हवेतून ऑक्सिजन घेता येईल असे फुफ्फुस तयार होऊ लागले. हे होता होता 1 कोटी वर्ष उलटली होती आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा दुसरी शीत लाट आली. त्यात पुन्हा एकदा 90% प्राणी नष्ट झाले. पण काही असे प्राणी होते जे या अवघड काळात खोल जमिनीत स्वतःला टिकवून ठेऊ शकत होते. जसे आजही उन्हाळ्यात बेडूक खोल जमिनीत गायब होतात आणि पावसाळ्यात जमिनीवर येऊन पुन्हा एकदा शक्ती गोळा करतात. दुसरी शीत लाट काही हजार वर्ष होती. त्यानंतर या टिकलेल्या प्राण्यांनी वेगाने प्रगती केली. समुद्रातील महाकाय जलचर आता जमिनीवर राहू लागले होते ज्याच्यापासून डायनासोर चे युग सुरू झाले होते. वेगाने म्हणजे 2-3 लाख वर्षाचा काळ होता. मग पुढील 25 कोटी वर्षात जमीन, पाणी आणि आकाशात उडू शकणारे असे हजारो प्रकाराचे डायनासोर या पृथ्वीवर राज्य करत होते. इतर प्राणी ही वाढत होते पण या महाकाय प्राण्यासमोर त्यांचे अस्तित्व दिसत नव्हते. 
25 कोटी वर्ष ही पृथ्वी या विशाल 30 मीटर उंच म्हणजे 100 फूट उंच. 50 हत्ती एकत्र करून जितके वजन होईल तितके वजनदार शाकाहारी डायनासोर आणि त्यांना मारणारे मांसाहारी डायनासोर आणि इतर पशू - पक्षी इथे राज्य करत होते. 
त्यानंतर पृथ्वीवर एक महाकाय दगड अंतराळातून येऊन धडकला. ज्याचा वेग ताशी 60000किमी होता जो हवेच्या घर्षणामुळे आगीचा महाकाय गोळा बनला होता. तो धडकताच पृथ्वीवर मोठे भूकंप सुरू झाले, समुद्रात त्स्नामी लाटा आल्या, धुळीचे वादळाने संपूर्ण वातावरण व्यापले. जंगले आगीत जळू लागलीत आणि पुन्हा एकदा पृथ्वीवर जीवन 80 ते 90% संपले. 10 12 लाख वर्ष पृथ्वी अशीच लाव्हारस, भूकंप, आग, वादळ यात जळत होती. आज जो आपण जमिनीतून कोळसा काढतो, खनिजे काढतो ती याच लावसरातून जंगले जळून जमिनीखाली गाडली गेली त्यातून तयार झाला आहे. 
अशा प्रकारे 5 -6 वेळा पृथ्वीवर जीवन नष्ट झाले आणि पुन्हा सुरू झाले आहे. 
जवळ जवळ आताच्या 25 कोटीवर्षपूर्वी पृथ्वीवर माकडे, गोरिला, हत्ती, चिंपाझी असे आज दिसते तसे प्राणी राज्य करत होते त्यातून 22-23 कोटी वर्षात माणसाचा विकास झाला आणि 50 लाख वर्षापूर्वी 2 पायावर चालणारा माणूस अस्तित्वात आला. 
पुढील 25 लाख वर्षांत माणसाचे पण अनेक प्रजातीतून विकास होत होमो सेपीयन जातीचा माणूस विकसित झाला. सुरवातीला फळ, कंदमुळे, पाने, खाणारा मनुष्य मग शिकार करू लागला आणि शाकाहार आणि मांसाहार करू लागला. 
9 वर्षापूर्वी आगीचा शोध लागला त्यानंतर 5 लाख वर्ष आग फक्त संरक्षणाचे साधन म्हणून वापरत होता. हळू हळू त्यात मांस आणि भाज्या भाजून खाऊ लागला.
2 लाख वर्षापूर्वी त्याला शेतीचा शोध लागला. 
50 हजार वर्षापूर्वी वसाहती करून राहू लागला.
आणि तिथून पुढे मानवी संस्कृती आकार घेऊ लागली.
तर अशा या पृथ्वीच्या 450 कोटी वर्षांत माणसाचा इतिहास फक्त 9 लाख वर्षाचा आहे. जो पृथ्वीच्या एकूण आयुष्याच्या 0.2% आहे. आणि आपण स्वतःला पृथ्वीचे मालक समजतो. 
यातून शिकण्यासारखं आहे आपण इथे 90-100 वर्ष आहे फक्त. ही पृथ्वी निरंतर राहणार आहे आणि स्वतःचे रूप बदलत राहणार आहे. त्यामुळे एक आनंदी, चांगले, सकारात्मक, जे आहे ते समाधानाने आपले समजून जागा..
धन्यवाद
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)