LPA Moreh site

LPA Moreh Site


इतिहास 
थर्मो फिशर इंडिया FSI सेल्स टीमला भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीच्या बॉर्डर सेफ्टी अँड सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून ज्याला आपण Land port authority म्हणतो त्याच्याकडून एक मोठी ऑर्डर मिळाली होती. 
भारतच्या 8 land port बॉर्डरवर रेडिएशन डिटेक्शन सिस्टम लावायची ऑर्डर. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार सीमेवरून भारतात येणारे सर्व सामान आणि मालमध्ये लपवून भारतात काही रेडिओक्टिव मटेरियल तर येत नाही ना ते तपासायचे काम हे मशीन करणार होते. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट भारतात होत होता. FSI division साठी Hi $2Mची मोठी ऑर्डर भेटली होती. 

scope of work
सर्व मटेरियल वेगवेगळ्या 8 बॉर्डर वर पोहचले होते. 
महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक संपूर्ण turn-key प्रोजेक्ट होता. सर्विस टीमला प्रत्येक साइटवर जाऊन लोकेशन identify करुन, बेस Structure चे सिव्हिल वर्क करून घ्यायचे होते. यासाठी लागणारे सिव्हिल मटेरियल, लेबर, स्ट्रक्चर drawing बनवून घेणे आणि फायनल करणे, त्यानंतर संपूर्ण स्ट्रक्चर उभे करणे, erection, commission, testing करणे.  बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कस्टम, आणि lpa टीमला training देणे, आणि SAT successful करणे. 

8 साईट पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार सीमेवर होत्या. 3 महिन्यात एकामागोमाग एक अशा 7 साईट पूर्ण केल्या होत्या. फक्त 1 म्यानमार बॉर्डर वरील मोरेह साईट शिल्लक होती. मणिपूर मध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि हिंसक आंदोलन सुरू होते आणि अजूनही आहे. शहरी भागातून सीमाभागात जाण्यास बंदी होती. 3 -4 महिने वाट बघून देखील परिस्थिती जशीच्या तशी होती. 
अवघड काळात साईटवर जायचे कारण
या एका शिल्लक राहिलेल्या installation मुळे आमचा रेव्हेन्यू recognise होत नव्हता. सेल्स टीम सतत फॉलोमअप करत होती. lpa दिल्ली मॅनेजमेंट आम्हाला साईट वर जा सांगत होती पण त्यांच्याकडून कोणताही सपोर्ट मोरेह बॉर्डरवर मिळणार नव्हता.  काम तर पूर्ण करायचे होते आणि त्यात अतिशय सेन्सिटिव्ह सीमेवर जायचे होते. 
प्लॅनिंग:
आम्ही moreh बॉर्डर वरील ICP Manager Mr.Baite यांच्याशी बोलून आम्हाला सहकार्य करायची विनंती केली. त्यांनी सहमती दाखवली आणि एक गवर्नमेंट चे परमिट लेटर आम्हाला पाठवले.

प्रवासाची सुरुवात: शेवटी मनाची तयारी करून शिरीष आणि मी मुंबई वरून इंफाळ ते म्यानमार बोर्डर मोरेह अशा प्रवासास निघालो. 
ते पावसाळ्याचे शेवटचे दिवस होते. पण मणिपूर मध्ये अजूनही पाऊस पडत होता. संध्याकाळी 4 वाजता आम्ही इंफाळला पोहचलो आणि लगेच म्यानमार बोर्डरकडे निघालो. जस की आपल्या सगळ्यांना माहित आहे. पूर्वेकडे अंधार लवकर पडतो. 120किमी अंतर होते आणि आम्ही जास्तीत जास्त 3 तासात पोहचू असा अंदाज लाऊन आम्ही प्रवास सुरू केला. इंफाळ आता मागे राहिले होते, घाट रस्ता सुरू झाला होता, गाडी आता वेडीवाकडी वळणे घेत घाट चढत होती,  सायंकाळचा प्रकाश कमी होत होता. रिमझिम पाऊस पडत होता. थोडा घाट चढलो आणि समोर मणिपूर पोलिसांची चेक पोस्ट लागली. आम्हाला गाडीतून उतरवले, id Card तपासले, आमचे पेपर चेक केले. गवर्नमेंट प्रोजेक्ट वर काम करण्यासाठी बॉर्डरवर जात आहे हे सांगितले. बंदुकधारी जवान आमच्या बाजूला शांतपणे उभे होते. आम्हाला तसेच तिथं 20 मिनिटे थांबवलं आणि मग त्या पोस्टवरील जवानांना त्यांच्या सिनिअर ऑफिसरचा फोन आला. मग आम्हाला पुढे जायची परवानगी भेटली. 
आतापर्यंत शिरीष आणि मला सुरक्षित वाटत होते. तिथून पुढे अजून 20 किलोमीटर वर दुसरी पोस्ट लागली. ही आसाम रायफल या मिलिटरी बटालियन ची पोस्ट होती. तोपर्यंत 6 वाजले होते. अंधार पडलेला होता. फक्त आमचीच गाडी त्या पोस्ट वर उभी होती. 5-6 बंदुकधारी जवान लगेच आमच्या गाडीच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले. आम्ही गाडीतून उतरलो आणि आम्हाला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. तिथे सिनिअर मेजर बसले होते. त्यांनी आमची कसून सगळी चौकशी केली. जवानांनी आमचे सर्व सामान तपासले आणि आम्हाला सांगितले इथून पुढे 6 च्या नंतर जाण्यास आणि येण्यास परवानगी दिली जात नाही. पण आता आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे त्यांनी आम्हाला एक विशेष परवानगीचे लेटर लिहून दिले आणि जमेल इतक्या लवकर अंतिम स्थानी पोहचण्यास सांगितले. तिथून आम्ही निघालो पण आता आमच्या मनात भीती वाढू लागली होती. पूर्ण घाट रस्ता, त्यात पाऊस पडत होता, मधे मधे रस्त्यावर माती वाहून आली होती. पुढील 50 किलोमीटर आम्हाला एकही गाडी क्रॉस झाली नाही की आमच्या मागून एखादी आली नाही. 
तो रस्ता संपत नव्हता. 2 तासांनी 50 किलोमीटर नंतर 3rd चेकपोस्ट आली. इथे पुन्हा आम्हाला जवानांनी घेरले. आमची कसून चौकशी झाली. सर्व सामान पुन्हा चेक झाले. सोबत आणलेले लेटर दाखवले. मग पुढे जाण्यास परवानगी दिली. 10किलोमीटर वर पुन्हा 4थी पोस्ट लागली. परत इथे थांबवले. इथे आमच्या ड्रायव्हर ची चौकशी केली आणि सोडले. अशा पाच पोस्ट करत करत आम्ही शेवटी मोरह कस्टम ऑफिसवर पोहचलो. 

शेवटी साईटवर पोहचलो:
  संपूर्ण कस्टम ऑफिस मधे फक्त आम्ही दोघेच राहायला होतो. पाण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती. फक्त लाईट होती. जवळच मिलिटरी बटालियन ची तुकडी ट्रक टर्मिनल मध्ये राहत होती. त्यांना विनंती करून आम्ही त्यांच्या कॅन्टीन मध्ये जेवण केले. रात्रीचे आम्हाला काही समजत नव्हते आजुबाजूला काय आहे ते.
दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा आजुबाजूच्या परीस्थितीचा अंदाज घेतला. आम्ही झीरो लाईनवर राहत होतो. घनदाट जंगलामध्ये दोन देशांच्या सीमेवर आम्ही राहत होतो.  मधे फक्त एक नदी होती आणि पलीकडे म्यानमार. 
एका दिवसात आम्ही कसेतरी साईटचे इन्स्पेक्शन केले. लोकल कॉन्ट्रेटर शोधला (तो IB चा माणूस होता हे आम्हाला नंतर काम झाल्यावर ICP Manager ने सांगितले) त्यांना काम समजावले आणि दुपारी आम्ही तिथून निघालो. पुन्हा सर्व चेक पोस्ट वर तशीच चेकिंग करत करत शेवटी आम्ही इंफाळला पोहचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. 
परत एक महिन्याने pre इरेक्शन काम झाले की यावेळी आम्ही तिघे शिरीष निहाल आणि जयंत असे तिघे मिळून परत गेलो. कारण यावेळी सर्व मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वर्क आणि टेस्टिंग आम्हालाच करायची होती. 
यावेळी परत त्याच दिव्यातून पार पडत 4 दिवसरात्र काम करून आम्ही इन्स्टॉलेशन पूर्ण केले. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहिलं असा होता. 

लर्निग
या कामामुळे आम्ही देशाच्या सुरक्षितीमध्ये वाढ केली.  आणि कोणतीही रेडिओक्टिव मटेरियल छुप्या मार्गाने आपल्या देशात येणार नाही यासाठी काम करायची संधी भेटली याचा अभिमान वाटत आहे. 
या LPA साईट वरील कामाच्या अनुभवामुळे FSI सेल्स टीम आता कोचिन एअरपोर्टवर $12M प्रोजेक्टवर  काम करत आहेत. 

History
Thermo Fisher India's FSI sales team received a major order from India's Land Port Authority (LPA), under the Home Ministry's Border Safety and Security Department. This was for installing radiation detection systems at 8 land border ports. The systems were meant to scan all goods and cargo entering India from borders with Pakistan, Nepal, Bangladesh, and Myanmar to detect any hidden radioactive materials. It was the first project of this kind in India, bringing in over $2M for the FSI division.Scope of WorkAll materials had reached the 8 different border sites. Importantly, it was a complete turn-key project. The service team had to visit each site, identify locations, get civil works done for base structures, arrange civil materials and labor, prepare and finalize structure drawings, erect the full structure, commission, test it, train Border Security Force, Customs, and LPA teams, and complete SAT successfully.Project Progress and ChallengeThe 8 sites were on borders with Pakistan, Nepal, Bangladesh, and Myanmar. Seven sites were completed one after another in 3 months. Only the Moreh site on the Myanmar border remained. Manipur was facing large-scale riots and violent protests, which continue even now. Travel from urban areas to border regions was banned. After waiting 3-4 months, the situation hadn't improved.Reason to Visit Amid CrisisThis pending installation was blocking revenue recognition. The sales team kept following up constantly. LPA Delhi management urged us to go to the site but offered no support at Moreh border. The work had to be done on a highly sensitive border.PlanningWe spoke to ICP Manager Mr. Baite at Moreh border and requested cooperation. He agreed and sent us a government permit letter.Journey BeginsFinally, with mental preparation, Shirish and I set off from Mumbai to Imphal and then to Moreh on the Myanmar border. It was the end of the monsoon season, but Manipur was still raining. We reached Imphal at 4 PM and headed straight to the Myanmar border. As everyone knows, darkness falls early in the east. The distance was 120 km, and we estimated 3 hours max, so we started. Imphal was behind us; the ghat road began. The car was twisting wildly uphill, evening light fading, drizzle falling. After some climb, we hit a Manipur police checkpost. They made us get out, checked IDs and papers. We explained we were going to the border for a government project. Armed soldiers stood quietly nearby. They held us for 20 minutes, then a senior officer called, and we got permission to proceed.
Till then, Shirish and I felt safe. 20 km ahead was another post of Assam Rifles military battalion. By then it was 6 PM, dark. Ours was the only vehicle. 5-6 armed soldiers surrounded our car immediately. We got out; they took us to their cabin. A senior major questioned us thoroughly. Soldiers checked all our luggage and said no travel allowed after 6 PM. With no other route, they gave us a special permission letter and told us to reach the final spot as fast as possible. We left, but fear grew in our minds. Full ghat road, rain pouring, occasional landslides blocking paths. For the next 50 km, no vehicle crossed us or came behind.
The road seemed endless. After 2 hours and 50 km, the 3rd checkpost. Soldiers surrounded us again, thorough questioning, luggage rechecked. We showed the letter; permitted ahead. 10 km further, 4th post. Stopped again; they questioned our driver and let us go. Crossing five such posts, we finally reached Moreh Customs office.Finally at SiteThe entire customs office had just us two to stay. No water, no food arrangements, only lights. Nearby, a military battalion unit stayed at the truck terminal. We requested and ate at their canteen. At night, we had no idea of surroundings.
Next day, we surveyed the situation. We were on the zero line in dense jungle on the two countries' border. Just a river in between, Myanmar on the other side.
In one day, we somehow inspected the site, found a local contractor (later ICP Manager revealed he was IB personnel), explained the work, and left in the afternoon. Again crossing all checkposts with checks, we reached Imphal, and only then did we feel alive.
A month later, for pre-erection work, Shirish, Nihal, and I (Jayant) went again. This time, all mechanical, electrical work, and testing had to be done by us.
Crossing the same ordeal, we completed installation in 4 days and nights. This experience will stay for life.LearningsThis work contributed to national security. Proud to have worked to prevent radioactive materials from sneaking into our country via covert routes.
This LPA site experience led the FSI sales team to the $12M Kochi Airport project they're now working on.


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)